मुंबई | 18 ऑक्टोबर 2023 : अभिनेता सलमान खान सध्या ‘बिग बॉस 17’ शोमुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस 17’ शोची सुरवात झाली आहे. आता चाहते शनिवारची वाट पाहात आहेत. ‘विक एन्डका वार’मध्ये शोचा होस्ट सलमान खान काय घोषणा करतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचीच नाही तर, शोचा होस्ट सलमान खान याच्याबद्दल देखील अनेक चर्चा रंगलेल्या असतात. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान ‘बिग बॉस’ शोच्या होस्टची जबाबदारी पार पाडत आहे. पण यासाठी अभिनेता गडगंज मानधन घेतो. तर आज जाणून सलमान खान याने कोणत्या सीझनसाठी किती कोटी रुपये मानधन म्हणून घेतलं आहे.
‘बिग बॉस’च्या चौथ्या सीझनपासून सलमान खान याने शोच्या होस्टची जबाबदारी सांभाळली. ‘बिग बॉस’च्या पहिल्या सीझनचा होस्ट अभिनेता अर्शद वारसी, दिसऱ्या सीझनच्या होस्टची जबाबदारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या खांद्यावर होती. ‘बिग बॉस’ शोच्या तिसऱ्या सीझनसाठी होस्ट महानायक अमिताभ बच्चन यांनी केलं.
त्यानंतर ‘बिग बॉस’च्या चौथ्या सीझनपासून सलमान खान शोच्या होस्टची जबाबदारी सांभाळत आहे. ‘बिग बॉस’ सीझन होस्ट करण्यासाठी सलमान खान एका एपिसोडसाठी बक्कळ मानधन घेतो. मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस’ सीझन 4. 5, 6 साठी अभिनेत्याने एका एपिसोडसाठी 2.5 कोटी रुपये मानधन घेतलं होतं.
‘बिग बॉस 7’ मध्ये देखील सलमान खान यांचं मानधन फार मोठं होतं. ‘बिग बॉस’च्या सातव्या सीझनसाठी अभिनेत्याने 5 कोटी रुपये मानधन घेत असल्याची माहिती समोर आली होती. सीझन 15 आठवडे सुरु होता. ‘बिग बॉस 7’च्या ट्रॉफीवर अभिनेत्री गौहर खान हिने स्वतःचं नाव कोरलं. त्यानंतर ‘बिग बॉस 8’ साठी मात्र अभिनेत्याच्या मानधनात मोठी वाढ झाली.
‘बिग बॉस 8’ साठी सलमान खान याने त्याच्या मानधनात तब्बल 50 लाख रुपयांची वाढ केली. ‘बिग बॉस 8’ शोच्या एका एपिसोडसाठी अभिनेत्याने 5.5 कोटी रुपये मानधन घेतलं होतं. ‘बिग बॉस 9’ आणि ‘बिग बॉस 10’ मध्ये अभिनेत्याच्या फीमध्ये मोठी वाढ झाली. दोन सीझनमध्ये एका एपिसोडसाठी सलमान खान याने 8 कोटी रुपये मानधन घेतलं.
‘बिग बॉस’ च्या 11 आणि 12 व्या सीझनचे देखील आकडे समोर आले आहेत. रिपोर्टनुसार, ‘बिग बॉस 11’ शो होस्ट करण्यासाठी सलमान खान याने 11 कोटी तर, ‘बिग बॉस 12’ साठी अभिनेत्याने एका एपिसोडसाठी १४ कोटी रुपये मानधन घेतलं होतं. ‘बिग बॉस’ च्या तेराव्या सीझनसाठी अभिनेत्याने 15.50 कोटी मानधन घेतलं.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘बिग बॉस 13’ सीझनसाठी अभिनेत्याने १५ कोटी रुपये मानधन घेतलं होतं. तर 14 व्या सीझनसाठी आभिनेत्याने 20 कोटी मानधन घेतलं होतं. ‘बिग बॉस 15’ सीझनसाठी अभिनेत्याने 15 कोटी रुपये मानधन घेतलं होतं. पण सोळाव्या सीझनसाठी सलमान खान याचं मानधन ऐकून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल. रिपोर्टनुसार अभिनेत्याने ‘बिग बॉस 16’ सीझनसाठी अभिनेत्याने तब्बल 45 कोटी रुपये मानधन घेतलं होतं.