बिग बॉस मराठी सीजन 5 चांगलाच धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे बिग बॉसच्या निर्मात्यांकडूनही घरातील सदस्यांना खास गेम देण्यात येत आहेत. बिग बॉस मराठीबद्दल एक वेगळीच क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळतंय. रितेश देशमुख हा या सीजनला होस्ट करताना दिसतोय. काही दिवसापूर्वीच बिग बॉस मराठीच्या मंचावर अक्षय कुमार हा पोहोचला होता. अक्षय कुमार यावेळी घरातील सदस्यांसोबत धमाल करतानाही दिसला. रितेश देशमुख याने अक्षय कुमार याला एक चॅलेज दिले होते. सूरज चव्हाण याने बोलले डॉयलॉग हे अक्षय कुमार याला बोलायचे होते. मात्र, अक्षय कुमार याने अगोदरच हार मानल्याचे बघायला मिळाले.
बिग बॉस मराठीमध्ये दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगांवकर या देखील पोहोचल्या आहेत. वर्षा उसगांवकर या बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होणार नसल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. मात्र, वर्षा उसगांवकर हा बिग बॉस मराठीच्या घरात दाखल झाल्या आहेत. वर्षा उसगांवकर या धमाकेदार गेम खेळतानाही बिग बॉसच्या घरात दिसत आहेत.
नुकताच आता बिग बॉसच्या निर्मात्यांकडून घरातील सदस्यांना एक टास्क देण्यात आलाय. वर्षा उसगांवकर या टास्कच्या संचालक आहेत. घरात दोन ग्रुप पडले आहेत. या टास्कमध्ये घरातील सदस्यांना जास्तीत जास्त मोती जमा करायचे आहेत. यावेळी निकी तांबोळी हिचा ग्रुप अगोदरच दुसऱ्या ग्रुपचे साहित्य घेऊन टाकतो.
यावेळी वर्षा उसगांवकर या बिग बॉसच्या निर्मात्यांकडे तक्रार करत म्हणाल्या की, बिग बॉस हे चुकीचे आहे. कारण गेम सुरू होण्याच्या अगोदरच साहित्य चोरी करण्यात आले. वर्षा उसगांवकर या निकी तांबोळीच्या विरोधातील ग्रुपसोबत खेळताना दिसल्या. मी व्यवस्थित निर्णय देणार असून गेम सुरू होण्याच्या अगोदर मी फेअर खेळणार नसल्याचा आरोप माझ्यावर केला जात असल्याचेही वर्षा उसगांवकर यांनी म्हटले.
बिग बॉसच्या घरात दोन बेबींचे आगमन झाले होते. या टास्कमध्ये त्या बेबींची काळजी घरातील सदस्यांना घ्यायची होती. मात्र, त्यावेळी वर्षा उसगांवकर यांना निकी तांबोळी हिने थेट म्हटले होते की, आईची माया तुम्हाला काय समजणार…यानंतर निकी तांबोळी हिच्यावर जोरदार टीका करण्यात आल्याचे बघायला मिळाले. ज्यानंतर मोठा हंगामा बघायला मिळाला.