‘बिग बॉस मराठी 5’मधून अरबाज पटेलने केली तगडी कमाई; 8 आठवड्यांसाठी मिळालं इतकं मानधन

| Updated on: Sep 24, 2024 | 3:25 PM

'बिग बॉस मराठी 5'च्या घरातून अरबाज पटेल बाहेर पडला आहे. गेल्या आठ आठवड्यात त्याने चांगलीच कमाई केली आहे. या शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी त्याला किती मानधन मिळायचं आणि त्याने आतापर्यंत किती कमावले ते जाणून घेऊयात..

बिग बॉस मराठी 5मधून अरबाज पटेलने केली तगडी कमाई; 8 आठवड्यांसाठी मिळालं इतकं मानधन
Arbaaz Patel
Image Credit source: Instagram
Follow us on

‘स्प्लिट्सविला’मधून लोकप्रियता मिळवलेला अरबाज पटेल नुकताच ‘बिग बॉस मराठी 5’च्या घरातून बाहेर पडला. गेल्या आठवड्यात वर्षा उसगांवकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण आणि अरबाज पटेल या पाच जणांना नॉमिनेट करण्यात आलं होतं. त्यापैकी कॅप्टन अरबाजला बिग बॉसच्या घराबाहेर जावं लागलं. कॅप्टनच एलिमिनेट होण्याची बिग बॉस मराठीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना होती. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी सर्वाधिक मतं सूरजला होती. तर वर्षा आणि जान्हवी यांनासुद्धा पुरेशी मतं मिळाली होती. अरबाज आणि निक्की हे दोघं डेंजर झोनमध्ये होते. ही जोडी बिग बॉसच्या घरात आणि घराबाहेर तुफान चर्चेत राहिली आहे. यानंतर अखेर अरबाजला बाद व्हावं लागलं होतं. बिग बॉसच्या घरात निक्कीला अरबाजचाच आधार होता, त्यामुळे त्याच्या एलिमिनेशनचं कळताच ती ढसाढसा रडू लागली.

अरबाज पटेलचा बिग बॉस मराठीमधील प्रवास संपला असला तरी इतक्या दिवसांत त्याने या शोमधून चांगली कमाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, अरबाजला एका आठवड्यासाठी 1.25 लाख रुपये मानधन मिळत होतं. बिग बॉसच्या घरात तो आठ आठवडे राहिला होता. त्यामुळे इतक्या दिवसांत त्याने 10 लाख रुपयांची कमाई केली आहे. शिवाय घराबाहेर पडल्यानंतर त्याला एक लाख रुपयांचं गिफ्ट वाऊचरसुद्धा मिळालं होतं.

हे सुद्धा वाचा

बिग बॉसच्या घरात अरबाज आणि निक्की यांच्यात खूप चांगली मैत्री झाली होती. मात्र घराबाहेरही अरबाज त्याच्या गर्लफ्रेंडमुळे सतत चर्चेत राहिला. अरबाजची गर्लफ्रेंड लिझा बिंद्रा सोशल मीडियावर सतत काही ना काही पोस्ट करत होती. त्यामुळे निक्की आणि अरबाजचं नातं सोशल मीडियावर सतत चर्चेत होतं.

“स्प्लिट्सविलामध्ये असताना 95 दिवस मी फोन आणि सोशल मीडियापासून दूर होतो. आता इथे पण मी फोन, सोशल मीडियापासून दूरच असणार आहे. ‘बिग बॉस’मध्ये जाण्याचं मी ठरवलं तेव्हा माझ्या आईला अश्रू अनावर झाले होते. आता मला ‘बिग बॉस’मध्ये पाहतानाही आईला रडू येत असेल. मी घरात जाण्याआधी शेवटचा फोनदेखील आईला केला होता. आता आई आणि माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. माझ्या घरातला मी कर्ता मुलगा आहे. आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरातही माझंच अधिराज्य असणार”, असा विश्वास अरबाजने बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी व्यक्त केला होता.