बिग बॉस मराठी सीजन 5 मध्ये धमाका होताना दिसतोय. विशेष म्हणजे अनेक दिग्गज कलाकार या सीजनमध्ये सहभागी झाले आहेत. बिग बॉस मराठीबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझही बघायला मिळतंय. आता नुकताच बिग बॉसच्या घरात भाऊचा धक्का झालाय. यावेळी घरातील अनेक सदस्यांचा क्लास लावताना रितेश देशमुख हा दिसला. विशेष म्हणजे रितेश देशमुख याच्याकडून चक्क निकी तांबोळी हिचे काैतुक देखील करण्यात आले. गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरात प्रामुख्याने दोन गट बघायला मिळाले. अख्ये घर एकीकडे आणि दुसरीकडे निकी तांबोळी आणि अभिजीत सावंत हे होते.
मागील आठवड्यामध्ये अरबाज पटेल हा घरातील साहित्याची तोडफोड करताना दिसला. अभिजीत सांवत आणि निकी तांबोळी यांच्यातील जवळीकता अरबाज याला अजिबात आवडली नाही. त्यांच्या नात्याला चुकीचा रंगत देताना देखील अरबाज दिसला. अभिजीत याच्याकडून स्पष्ट त्यावेळी सांगण्यात आले की, माझे बाहेर कुटुंब आहे आणि माझे लग्न झाले आहे.
यामुळेच या नात्याला चुकीचे नाव देऊ नका. आता यावरूनच रितेश देशमुख याने अरबाजचा क्लास लावला. रितेश देशमुख म्हणाला की, अरबाज तुम्ही निकी आणि अभिजीतच्या मैत्रीमुळे का नाराज होत आहात? तुम्ही तर म्हणाले ना बाहेर तुम्ही रिलेशनसाठी कमिटेड आहात. मग हे सुरू आहे ते काय?
म्हणजे तुझ्या निकी तांबोळीबद्दल असलेल्या सर्व फिलिंग फेक आहेत. हेच नाही तर रितेश देशमुख याने अरबाज पटेल याला म्हटले की, तू बिग बॉसच्या घरात रिअल राहा. मुळात म्हणजे बिग बॉसच्या घरात येण्याच्या अगोदर अरबाज पटेल हा लीजा बिंद्रा हिला डेट करत होता. हेच नाही तर त्यांचा किसिंगचा फोटोही व्हायरल होताना दिसला.
अरबाज पटेल याने बिग बॉसच्या घरात बऱ्याचवेळा बोलून दाखवले की, त्याच्या मनात निकी तांबोळी हिच्याबद्दल फिलिंग आहेत. घरातील अनेक सदस्यांना वाटते की, निकी तांबोळी हिने अरबाज पटेल याला धोका दिला आहे. त्यावरच बोलताना रितेश देशमुख हा दिसलाय. रितेश देशमुख याने घरातील इतरही सदस्यांचा क्लास लावल्याचे बघायला मिळाले.