रितेश देशमुख सूत्रसंचालन करत असलेल्या ‘बिग बॉस मराठी 5’चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. बारामतीच्या सूरज चव्हाणने या सिझनचं विजेतेपद पटकावलं. तर गायक अभिजीत सावंत दुसऱ्या स्थानी राहिला. तिसऱ्या क्रमांकावर निक्की तांबोळी आणि चौथ्या स्थानी धनंजय पोवार होता. 70 दिवस बिग बॉसच्या घरात राहिलेल्या सूरजला चाहत्यांनी विजेता बनवलं. सूरजला 14.60 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. त्याचसोबत इलेक्ट्रिक स्कूटर आणि 10 लाख रुपयांचा ज्वेलरी वाऊचर मिळाला. विशेष म्हणजे पराभूत झालेल्या अभिजीत सावंतनेही या शोमधून तगडी कमाई केली आहे.
सूरज चव्हाणला एकूण 24.6 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळाले. तर बिग बॉसच्या शोसाठी दर आठवड्याला त्याला 25 हजार रुपये फी मिळत होती. याची एकूण रक्कम 2.5 लाख रुपये इतकी होते. त्याचसोबत जिंकल्यानंतर अभिजीतला मिळालेली रक्कम आणि हे मानधन मिळून त्याची एकूण कमाई सूरजपेक्षा 14 टक्क्यांनी जास्त आहे. बिग बॉसच्या घरात अभिजीतने आपला दमदार खेळ सादर केला होता. त्यामुळे विजेतेपदावर तोच नाव कोरेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र सूरजने अभिजीतला मात देत ट्रॉफी आपल्या नावावर केली. फिनालेमध्ये अभिजीतला एक लाख रुपयांचा गिफ्ट वाऊचर मिळाला आहे. खरंतर रनर अपला कोणतीच कॅश प्राइज मिळत नाही, पण तरीही अभिजीतने या शोमधून चांगली कमाई केली आहे.
अभिजीत सावंतला दर आठवड्यासाठी 3.5 लाख रुपये मानधन मिळत होतं. त्यामुळे शोमधून त्याने एकूण 35 लाख रुपयांची कमाई केली होती. अभिजीतची एकूण संपत्ती ही 1.2 ते 8 कोटी रुपये इतकी असल्याचं म्हटलं जातंय. त्याचप्रमाणे तो एका परफॉर्मन्ससाठी 6 ते 8 लाख रुपया मानधन घेतो. बिग बॉसच्या शोमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी निक्की तांबोळी ही सेकंड रनर अप ठरली. निक्कीला दर आठवड्याला 3.75 लाख रुपये मानधन मिळत होतं. म्हणजेच तिने जवळपास 37.50 लाख रुपयांची कमाई केली आहे.
अभिजीत सावंतला रिॲलिटी शोमुळेच लोकप्रियता मिळाली. त्याने ‘इंडियन आयडॉल’ या गाण्याच्या शोचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर त्याने ‘जो जीता वही सुपरस्टार’ आणि ‘एशियन आयडॉल’मध्येही भाग घेतला होता. तर सूरज हा सोशल मीडिया इन्फ्लूएनसर आहे. विनोद आणि अनोख्या स्टाइलमुळे तो सोशल मीडियावर लोकप्रिय आहे.