बिग बॉसच्या घरात मोठा हंगामा बघायला मिळतोय. विशेष म्हणजे हे सीजन चांगलेच धमाका करताना दिसत आहे. अरबाज पटेल हा बिग बॉसच्या घराचा नवा कॅप्टन झालाय. खास एक टास्क बिग बॉसने घरातील सदस्यांना दिला. यामध्ये दोन टीम नेहमीप्रमाणे घरात बघायला मिळाल्या. नेहमीप्रमाणे बिग बॉसने निकी तांबोळी हिचा क्लास लावल्याचे बघायला मिळाले. निकी तांबोळी हिने अरबाज पटेल हा कॅप्टन झाल्यानंतर म्हटले होते की, मी आता सर्व ऐकणार आहे, कारण माझा मित्र कॅप्टन झालाय. हेच नाही तर मागील आठवड्यामध्ये मोठी भांडणेही निकी तांबोळी हिने केली आहेत.
आता बिग बॉसच्या घरात वेगळेच एक समीकरण बघायला मिळतंय. छोटा पुढारी अर्थात सर्वांचा आवडता धनश्याम दरोडे हा निकी तांबोळी हिच्या खूप जवळ येताना दिसतोय. हेच नाही तर बिग बॉसच्या घरात जास्त वेळ निकी तांबोळी आणि घनश्याम हे एकत्र बसल्याचे बघायला मिळतंय. मात्र, अगोदर निकी तांबोळी आणि घनश्याम यांनी स्पष्ट केले की, आम्ही बहिण भाऊ आहेत.
घरातील जास्त करून सदस्यांना निकी तांबोळी आणि छोट्या पुढारीची मैत्री ही आवडताना दिसत नाहीये. दुसरीकडे टास्कवेळी घरातील काही सदस्य हे छोट्या पुढारीला रागात बोलताना दिसले. हेच नाही तर त्याच्यावर ओरडण्यात देखील आले. यानंतर छोट्या पुढारीने थेट म्हटले की, आवाज कमी करून बोलायचे…
माझ्यासोबत बोलायचे तर आवाज कमीच ठेवायचा असे थेट घरातील सदस्यांना ठणकावताना छोटा पुढारी हा दिसला. विशेष म्हणजे कॅप्टनशी टास्कमध्ये धमाकेदार गेम खेळतानाही छोटा पुढारी दिसला. निकी तांबोळी याच्यासोबतची छोट्या पुढारीची वाढलेली मैत्री अनेकांना पटत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे.
काही दिवसांपूर्वीच एका टास्कनंतर छोट्या पुढारीला किस देताना निकी तांबोळी ही दिसली होती. यावेळी निकी तांबोळी हिच्याकडून स्पष्ट करण्यात आले होते की, हा घनश्याम माझ्या लहान भावासारखा आहे. घनश्याम आणि निकी तांबोळी यांचे अनेक फोटो देखील त्यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले होते. मराठी बिग बॉसच्या अगोदर निकी तांबोळी ही हिंदी बिग बॉसमध्येही धमाका करताना दिसली आहे.