आयपीएलशी खास कनेक्शन असलेल्या ‘परदेसी गर्ल’चा ‘बिग बॉस मराठी 5’ला रामराम

| Updated on: Aug 26, 2024 | 10:28 AM

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील ‘परदेसी गर्ल’ इरिना रूडाकोवाचा प्रवास संपला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात पहिल्यांदाच एका ‘परदेसी गर्ल’ची एण्ट्री झाली होती. गेले चार आठवडे तिने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. सॉलिड परफॉर्मर, कमालीची डान्सर आणि अभिनेत्री असणारी इरिना महाराष्ट्रातील जनतेची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. ‘बिग बॉस मराठी’चा खेळ चांगला खेळण्याचा इरिनाचा प्रयत्न होता. मात्र […]

आयपीएलशी खास कनेक्शन असलेल्या परदेसी गर्लचा बिग बॉस मराठी 5ला रामराम
इरिना रुडाकोवा, रितेश देशमुख
Image Credit source: Instagram
Follow us on

‘बिग बॉस मराठी’च्या घरातील ‘परदेसी गर्ल’ इरिना रूडाकोवाचा प्रवास संपला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासात पहिल्यांदाच एका ‘परदेसी गर्ल’ची एण्ट्री झाली होती. गेले चार आठवडे तिने प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं. सॉलिड परफॉर्मर, कमालीची डान्सर आणि अभिनेत्री असणारी इरिना महाराष्ट्रातील जनतेची मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे. ‘बिग बॉस मराठी’चा खेळ चांगला खेळण्याचा इरिनाचा प्रयत्न होता. मात्र या खेळाच्या अंतिम फेरीपर्यंत तिला टिकता आलं नाही.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात इरिनाने आंतरराष्ट्रीय स्टाइलने कल्ला करण्यासोबत मराठीचे धडे गिरवले. इरिनाची मराठी भाषा शिकण्याची धडपड, तिचा मराठी भाषेतला गोडवा ‘बिग बॉस’ प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरला. एकादशीचा उपवास, पुरणपोळी बनवणं, उखाणा घेणं, मराठी गाण्यांवर डान्स करणं अशा अनेक गोष्टींमुळे इरिनाने भारतीयांच्या मनात आपली विशेष जागा निर्माण केली. भारतीय नसलेली इरिना इथल्या संस्कृतीशी स्वत:ला जोडून घेताना दिसून आली. इरिनाचे मराठी उच्चार स्पष्ट नसले तरी तिचं बोलणं ऐकणं प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा विषय झाला होता.

हे सुद्धा वाचा

‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेतल्यानंतर इरिना म्हणाली, “बिग बॉस मराठी’च्या घराची आता शंभर टक्के मला आठवण येणार आहे. या घरातून बाहेर पाऊल टाकल्यापासूनच मी घराला मिस करू लागले आहे. घरातील लोक मला समजून घेण्यास कमी पडले असं मला वाटत नाही. सर्वच सदस्यांसोबत मी जोडले गेले होते. मला मराठी भाषा चांगली येत असती तर कदाचित मी हा खेळ आणखी चांगला खेळू शकले असते. मला वाटतं ‘बिग बॉस मराठी’च्या या सिझनमधील टॉप 3 सदस्य हे वैभव, अरबाज आणि डीपी दादा हे आहेत.”

इरिना पुढे म्हणाली, “बिग बॉस मराठी’च्या घराने मला अनेक आठवणी दिल्या आहेत. खेळ खेळण्याच्या नादात स्वत:ला विसरू नका, स्वत:ला सिद्ध करा, असं मला आता इतर सदस्यांना सांगायचं आहे. इनव्हेस्टमेंट बॉक्समध्ये असलेला 50 पॉईंट्सच्या एक कॉईनचा नॉमिनी मी वैभवला करू इच्छिते. वैभवला 100 दिवस ‘बिग बॉस मराठी’च्या खेळात पाहण्याची माझी इच्छा आहे.”

‘बिग बॉस मराठी’च्या घरातून इरिना रूडाकोवा बाहेर पडली आहे. याआधी इरिनाआधी पुरुषोत्तम पाटील, योगिता चव्हाण आणि निखिल दामले हे सदस्य बाहेर पडले आहेत. त्यामुळे आता घरात 12 सदस्य उरले आहेत. आता या 12 सदस्यांचा खेळ पाहताना प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.