Riteish Deshmukh on Jahnavi Killekar : ‘बिग बॉस मराठी’ शोच्या 5 व्या भागात आता स्पर्धकांचे गट तयार झाले आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या घरात सतत वाद आणि भांडणं पाहायला मिळत आहेत. स्पर्धक निक्की तांबोळी आणि ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचे वाद देखील तुफान रंगले. आता दुसऱ्या आठवड्यात जान्हवी किल्लेकरने घरातील बऱ्याच सदस्यांशी वाद घातले. दरम्यान, जान्हवी हिने वर्षा यांच्यासाठी अपशब्दांचा देखील वापर केला. ज्यामुळे ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश देशमुखने जान्हवीला चांगलंच खडसावलं…
गार्डन एरियामधून जान्हवी, वर्षा यांनी म्हणाली, ‘इथे पोरं बसलीत म्हणून तुम्ही इथे येता…’ यावर वर्षा उसगांवकर म्हणाल्या, ‘अगं पोरं काय म्हणतेस… मी माझ्या नवऱ्यासोबत आनंदी आहे. हे किती गलिच्छ बोलणं आहे. ‘बिग बॉस’ तुमच्यापेक्षा मोठा आवाज या कळसूत्री बाहुलीचा आहे.’
जान्हवी पुढे म्हणते, ‘घाणेरडा अर्थ तुम्ही काढताय… घाणेरडी अॅक्टिंग माझ्यासमोर करू नका… तुमचं घाणेरडं तोंड माझ्यासमोर दाखवूच नका ताई…’ शिवाय वर्षा उसगांवकर यांना मिळालेल्या पुरस्कारांबद्दल देखील जान्हवीने मोठं वक्तव्य केलं. यावर रितेश देखमुख यांनी जान्हवीला खडसावलं आहे. सध्या शोचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
रितेश देशमुख, जान्हवीला म्हणाले, ‘जान्हवी, ही जी डोक्यात हवा आहे ना तुमच्या… ही बाकीच्यांना बाहेर काढेल की माहीत नाही, पण तुम्हाला नक्की काढेल. सतत इतरांची लायकी काढायची. कधीतरी आरशासमोर उभं राहायचं आणि विचारायचं की… तुम्ही वर्षाजींना काय म्हणालात?’
‘ हे घाणेरडं तोंड मला दाखवू नका. तेव्हा वर्षाजी म्हणाल्या, ‘मला अभिनयासाठी शासनातर्फे तीन-तीन पुरस्कार मिळालेले आहेत.’ तेव्हा तुम्ही म्हणालात, ‘पश्चाताप होत असेल त्यांना की त्यांनी त्यांनी तुम्हाला हे अवॉर्ड्स दिले…’
पुढे वर्षा उसगांवकर यांची बाजू मांडत रितेश म्हणाले, ‘जेवढे प्रोजेक्ट्स तुम्ही केले नसतील ना… तुम्ही काय मी सुद्धा केले नसतील ना, तेवढे प्रोजेक्ट वर्षाजींनी रिजेक्ट केले आहेत…’ असं देखील रितेश देखमुख म्हणाले. सध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस मराठी’ शोचा प्रोमो तुफान व्हायरल होत आहे.