बिग बॉस मराठी सीजन 5 च्या घरात मोठा हंगामा बघायला मिळाला. हेच नाही तर फिनाले वीकला सुरूवात झाल्यानंतरही घरातील सदस्यांमध्ये मोठे वाद बघायला मिळत आहेत. अंकिता वालावलकर हिने बिग बॉसच्या घरात सुरूवातीपासूनच सूरज चव्हाण याला टार्गेट करण्यास सुरूवात केली होती. हेच नाही तर तिने बऱ्याचदा छोटी छोटी कारणे देऊन सूरज चव्हाण याला नॉमिनेशनमध्ये टाकले. मात्र, धमाकेदार फॅन फॉलोइंग असल्याने दरवेळी नॉमिनेशनमध्ये जाऊनही सूरज सुरक्षित राहिला. त्यामध्येच अंकिता अनेक गोष्टींवरून घरात सूरजला टार्गेट करताना देखील दिसली.
सूरज चव्हाण याच्यामुळे अंकिता वालावलकर आणि निकी तांबोळी यांच्यात जोरदार वाद झाल्याचे बघायला मिळाले. हेच नाही तर यावेळी कॅमेऱ्यासमोर येत निकी तांबोळी हिने थेट अंकिता हिच्यावर काही मोठे आरोपही केले. अंकिता आणि निकी तांबोळी यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद बिग बॉसच्या घरात होताना दिसतोय.
निकी तांबोळी हिने कॅमेऱ्यासमोर जात म्हटले की, ही अंकिता वालावलकर बाई खूप जास्त कुचकी आहे…सारखे त्या सूरजला छोट्या छोट्या गोष्टींवरून बोलते. विशेष म्हणजे निकी तांबोळी ही योग्य बोलत असल्याचे देखील अनेकांचे म्हणणे आले. अंकितावर अनेक आरोप करताना यावेळी निकी तांबोळी ही दिसली.
हेच नाही तर अभिजीत सावंत आणि अंकिता वालावलकर यांच्यातही जोरदार वाद बघायला मिळाला. अभिजीत सावंत हा निकी तांबोळी हिच्यासोबत बोलतो आणि तिने सांगितलेल्या गोष्टी ऐकतो हीच गोष्ट अजिबातच अंकिता वालावलकर हिला पटत नाही. अंकिता आणि वर्षा उसगांवकर यांच्यात काही गोष्टींवरून जमत नव्हते.
पॅडी कांबळे जवळ वर्षा उसगांवकर यांच्याविरोधात बोलताना अनेकदा अंकिता ही दिसली. बिग बॉसच्या घरात सुरूवातीपासूनच मोठे हंगामे होताना दिसले. सूरज चव्हाण हाच बिग बॉसचा विजेता होईल, असे अनेकांचे म्हणणे आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्यांना त्यांचा संपूर्ण प्रवास देखील बिग बॉसच्या निर्मात्यांकडून दाखवण्यात आला.