आपली मराठीच लय भारी…, असं का म्हणाला सूरज चव्हाण? कारण आहे खास

| Updated on: Oct 11, 2024 | 11:27 AM

Suraj Chavan: आपली मराठीच लय भारी..., सूरज चव्हाण याच्या 'त्या' वक्तव्याची तुफान चर्चा, असं का म्हणाला 'बिग बॉस मराठी 5' शोचा विजेता?, चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून फक्त आणि फक्त सूरज चव्हाण याची चर्चा...

आपली मराठीच लय भारी..., असं का म्हणाला सूरज चव्हाण? कारण आहे खास
Follow us on

‘झापुक झुपूक…’ अंदाजात चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा सूरज चव्हाण आता सर्वत्र चर्चेत असते. सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाण यांच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. पूर्वी सूरज फक्त सोशल मीडिया स्टार म्हणून प्रसिद्ध होता. आता ‘बिग बॉस मराठी’ पाचव्या पर्वाचा विजेता म्हणून देखील सूरज चव्हाण याची ओळख आहे. ‘बिग बॉस’ मुळे सूरजच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान सूरज याच्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात.

नुकताच झालेल्या मुलाखतीत सूरज चव्हाण याने मराठी भाषा आणि हिंदी ‘बिग बॉस’बद्दल मोठा खुलासा केला आहे. ‘हिंदी बिग बॉसमध्ये तुला जायला आवडेल का?’ असा प्रश्न सुरज याला विचारण्यात आला. यावर सूरज याने नकार देत मराठी भाषेचं कौतुक केलं.

हे सुद्धा वाचा

 

 

सूरज म्हणाला, ‘हिंदी बिग बॉसमध्ये जायची माझी इच्छा नाही. मराठी बिग बॉस उत्तम आहे. मराठी बिग बॉस माझ्यासाठी लयच भारी आहे. हिंदी मला बोलायला येत नाही आणि समजणार देखील नाही. मराठी भाषेनं मला समजून घेतलं आहे. आपली मराठी भाषा लय भारी… आपली मराठीच माणसं लय क्वालिटी आहेत…’ असं देखील सूरज म्हणाला.

‘बिग बॉस मराठी 5’ शोचा विजेता ठरला सूरज चव्हाण

‘बिग बॉस मराठी 5’ शोचा विजेता गायक अभिजीत सावंत ठरेल… अशी सर्वत्र चर्चा रंगली होती. पण शेवटच्या क्षणी अभिनेता आणि शोचा होस्ट रितेश देशमुख याने विजेता म्हणून सूरज चव्हाण याच्या नावाची घोषणा केली. विजेता म्हणून नाव घोषित झाल्यानंतर सूरज याच्यावर ट्रॉफीसोबतच 14 लाख धनादेश, आलिशान कार आणि अन्य बक्षीसांचा देखील वर्षाव झाला.

सांगायचं झालं तर, सूरज चव्हाण आज मोठं नाव झालं आहे. फक्त सोशल मीडियावर नाही तर, चाहत्यांमध्ये देखील त्याच्या चर्चा रंगलेल्या असतात. सोशल मीडियावर सूजर चव्हाण याचे 2.4 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तर सूरज फक्त 76 नेटकऱ्यांना फॉलो करतो.