छपरीपणा सुरू करायला हवा..; सूरज जिंकताच मराठी अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य

| Updated on: Oct 08, 2024 | 3:26 PM

सूरज चव्हाणने बिग बॉस मराठीचं विजेतेपद पटकावलं आहे. त्याच्या या विजयावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका मराठी अभिनेत्रीने याबाबत लिहिलेली पोस्ट चर्चेत आली आहे. मी गरीब आहे अशी पोस्ट या अभिनेत्रीने लिहिली आहे.

छपरीपणा सुरू करायला हवा..; सूरज जिंकताच मराठी अभिनेत्रीचं मोठं वक्तव्य
सूरज चव्हाण
Follow us on

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाण हा ‘बिग बॉस मराठी 5’चा विजेता ठरल्यानंतर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून येऊन इथपर्यंत पोहोचल्याबद्दल काहींनी त्याचं कौतुक केलंय. तर काहींनी सहानुभूती म्हणून सूरजला ट्रॉफी दिल्याचं म्हटलंय. अशातच बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात स्पर्धक राहिलेली अभिनेत्री आरती सोळंकीची पोस्ट विशेष चर्चेत आली आहे. सूरजने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली तर मी पुढचा सिझन बघणारच नाही, असं तिने सुरुवातीला जाहीर केलं होतं. आता सूरज जिंकल्यानंतर तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर उपरोधिक पोस्ट लिहिली आहे. ‘मी गरीब आहे’, अशी पोस्ट लिहित तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘छपरीपणा सुरू करायला हवा.’

याविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आरती म्हणाली, “सूरजला विजेता बनवून त्यांनी माझ्यावर अन्याय केला आहे. मी ती पोस्ट माझ्यासाठीच केली आहे की मीसुद्धा गरीब आहे. मला बिग बॉसच्या घरातून पहिल्याच आठवड्यात बाहेर काढलं गेलं. मी गेल्या 24 वर्षांपासून या इंडस्ट्रीत स्ट्रगल करतेय. त्यांनी माझा जराही विचार केला नाही. माझा आवाज बसलाय हे कारण देऊन मला घराबाहेर काढलं होतं. बिग बॉसच्या घरात 100 दिवस राहण्यासाठी माझ्याकडे कपडेसुद्धा नव्हते. माझा सूरजवर राग नाही. मी त्याची शत्रू नाही. पण गरीब आणि श्रीमंत बघून या खेळात कोण टिकणार हे ठरवल्याचा मला राग आहे. मला संधी मिळाली असती तर मी टॉप 5 मध्ये असते.”

हे सुद्धा वाचा

सूरज जिंकला हे अनेकांना पटलं नाही, असंही आरतीने म्हटलंय. एका युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आरती सूरजबद्दल म्हणाली होती, “मी साधाभोळा, गरीब घरातून आलोय, इथून आलोय, तिथून आलोय असं बोलून चालत नाही. कारण बिग बॉसच्या घरात राहणं खूप अवघड आहे. त्यामुळे या गोष्टीला माझ्याकडून तरी सहानुभूती नाही मिळणार. मीसुद्धा गरीब, चाळीतली पोरगी आहे. त्यामुळे एखादा गरीब जिंकला तर मला नक्कीच आवडेल. त्याला या शोमधून आणखी प्रसिद्धी मिळू दे. जिथे तो 80 हजार रुपये घेतोय, तिथे 8 लाख घेऊ दे. पण काहीच खेळ न खेळता तो पुढपर्यंत गेला आणि जिंकला तर पुढचा सिझनच मी बघणार नाही. हे मी आताच स्पष्ट करतेय. कारण बिग बॉसचा खेळ खूप कठीण आहे. मी गरीब.. अशी सिंपथी मी नाही पचवू शकत.”