Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ शोच्या पाचवा सिझनमध्ये आता स्पर्धक वेग-वेगळे रंग भरताना दिसत आहेत. खेळ, मैत्री, प्रेम, भांडणांमुळे सध्या सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’ शोच्या पाचव्या सिझनची चर्चा रंगली आहे. शोमधील प्रत्येक स्पर्धक स्वतःचं अस्थित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर तसे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहेत. आता देखील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ शियन इरीना रुडाकोव्हाने (Irina Rudakova) हिचा आहे. व्हिडीओमध्ये इरीना मराठी गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहेत.
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अभिनेता आणि शोचा होस्ट रितेश देशमुख याच्या भाऊच्या धक्क्यावर धनंजय माने, इरीना हिला मराठमोळा डान्स शिकवताना दिसत आहे. दोघे देखील ‘पाछाडलेला’ सिनेमातील ‘रुपानं देखणी, सुपारी चिकणी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि धनंजय आणि इरीना यांच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.
सांगायचं झालं तर, बिग बॉसच्या घरात इरीना कायम तिचं मराठीबद्दल प्रेम आणि वाटणारं कौतुक करताना दिसते. ज्यामुळे इरीना सर्वांचं मन जिंकत आहे. शिवाय मराठीचे धडे देण्यासाठी धनंजयचे सुरु असलेले प्रयत्नही साऱ्यांचं मन जिंकत आहेत.
सांगायचं झालं तर, इरीना हिने जेव्हा ‘बिग बॉस’च्या प्रवेश केल्यानंतर, सोशल मिडिया स्टार अंकिता वालावलकर इरीना हिच्यामुळे एका मराठी स्पर्धकाची जागा गेली… असं वक्तव्य केलं होते. तेव्हा रितेश याने अंकिता हिला चांगलंच सुनावत इरीना हिचं कौतुक केलं होतं.
सध्या बिग बॉसच्या घरात सगळ्यात जास्त मराठीपण जपणारी कुणी व्यक्ती असेल तर ती इरीना आहे…. असं वक्तव्य करत रितेश देशमुख याने अंकिताला सुनावलं होतं. तर इरीना हिने भाऊच्या धक्क्यासाठी केलेल्या लूकची देखील चर्चा रंगत आहे. हिरव्या रंगाच्या लेहेंग्यामध्ये इरीना हिचं सौंदर्य उठून दिसत होतं.