6 ऑक्टोबर 2024 म्हणजेच उद्या बिग बॉस मराठी सीजन 5 चा फिनाले पार पडणार आहे. रितेश देशमुख धमाकेदार पद्धतीने या फिनालेला होस्ट करताना दिसणार आहे. बिग बॉसच्या घरात टॉप 6 फायनलिस्ट पोहोचले आहेत. विशेष म्हणजे सुरूवातीपासूनच या सीजनबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ ही बघायला मिळाली. अनेक रेकॉर्ड या सीजनने ब्रेक केले. आता फिनाले वीकला सुरूवात झालीये. मात्र, फिनाले वीकला सुरूवात होऊनही घरात मोठा वाद बघायला मिळाला. अंकिता वालावलकर आणि अभिजीत सावंत यांच्यात वाद झाला. अंकिता ही तिचे ऐकत नसल्याने कायमच अभिजीत सावंत याच्यावर चिडताना दिसते.
आता नुकताच बिग बॉसच्या घरात काही पाहुणे आले होते. यावेळी त्यांनी घरात उपस्थित असलेल्या सहा सदस्यांना काही मोठे प्रश्न विचारले. यावेळी पाहुण्यांनी विचारले की, घरातील एका अशा सदस्याचे नाव सांगा तो दिसतो तसा अजिबात नाहीये. यावर घरातील सर्व सदस्यांनी अंकिता वालावलकर हिचे नाव दिले.
घरातील सदस्यांचे म्हणणे आले की, ती जशी साधी आणि भोळी चेहऱ्यावरून दिसते तशी ती अजिबातच नाही. विशेष म्हणजे घरातील सर्व सदस्यांनी मिळून तो निर्णय घेतला. म्हणजेच काय तर जशी दिसती तशी अंकिता वालावलकर अजिबात नाहीये असे घरातील सदस्यांचे म्हणणे आले. अंकिता वालावलकर हिचे घरातील जवळपास सर्वच सदस्यांमध्ये वाद झाले आहेत.
फक्त हेच नाही तर वर्षा उसगांवकर यांच्या मागेही त्यांच्याबद्दल बोलताना अनेकदा अंकिता दिसली. अभिजीत सावंत, निकी तांबोळी, सूरज चव्हाण यांच्यासोबतही तिचे बऱ्याच मोठे वाद झाले. अंकिता वालावलकर हे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. अंकिता वालावलकर हिने सूरज चव्हाण यालाही अनेकदा नॉमिनेशनमध्ये टाकले.
फिनाले वीकमध्येही सूरज चव्हाण याच्यामुळे निकी तांबोळी आणि अंकिता वालावलकर यांच्यात वाद झाल्याचे बघायला मिळाले. जेवण करत असताना अन्न टेबलवर सांडल्यावरून सूरजला रागावून बोलताना अंकिता वालावलकर ही दिसली होती. त्याला काही बोलू नको आता किती दिवस राहिले आहेत हवे तर मी साफ करते असेही निकीने म्हटले होते.