‘बिग बॉस मराठी सीजन 5’च्या विजेत्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, वोटिंग ट्रेंडमध्ये थेट ‘हा’ स्पर्धक…

| Updated on: Oct 06, 2024 | 2:01 PM

Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसले. विशेष म्हणजे या सीजनमध्ये अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. आता अवघ्या काही तासांवर बिग बॉसचा फिनाले आलाय. स्पर्धकांमध्ये मोठी चुरस ही बघायला मिळतंय.

बिग बॉस मराठी सीजन 5च्या विजेत्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, वोटिंग ट्रेंडमध्ये थेट हा स्पर्धक...
Bigg Boss Marathi Season
Follow us on

बिग बॉस मराठी धमाका करताना दिसले. मात्र, निर्मात्यांनी सर्वांनाच मोठा धक्का देत थेट जाहीर केले की, हे सीजन 70 दिवसांमध्येच संपणार आहे. सीजन टीआरपीमध्येही धमाकेदार कामगिरी करत असताना आणि प्रेक्षक प्रेम देत असताना निर्मात्यांनी असा निर्णय का घेतला? हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. बिग बॉस 18 मुळे निर्मात्यांना अशाप्रकारचा निर्णय घ्यावा लागल्याची चर्चा आहे. आता बिग बॉस मराठी सीजन 5 च्या फिनालेला काही तासच शिल्लक आहेत. 6 ऑक्टोबर 2024 म्हणजेच उद्या बिग बॉस मराठी सीजन 5 चा फिनाले होईल. रितेश देशमुख हा बिग बॉस मराठीच्या फिनालेला होस्ट करताना दिसले.

बिग बॉस मराठी सीजन 5 ला त्यांचे टॉप 6 फायनलिस्ट मिळाले आहेत. अंकिता वालावलकर, अभिजीत सावंत, निकी तांबोळी, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि जान्हवी किल्लेकर हे बिग बॉसच्या घरात आहेत. आता नुकताच बिग बॉस मराठी सीजन 5 चा वोटिंग ट्रेंड पुढे येताना दिसतोय. यामध्ये स्पष्ट कळतंय की, कोण टॉपला आहे.

वोटिंग ट्रेंडनुसार सूरज चव्हाण हा वोटिंग ट्रेंडमध्ये टॉपला आहे. या शर्यतीमधून विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला अभिजीत सावंत हा थोडा मागे पडल्याचे स्पष्टपणे बघायला मिळतंय. रिपोर्टनुसार सूरज चव्हाण हा पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या नंबरवर अंकिता वालावलकर आहे. तिसऱ्या क्रमांकावर अभिजीत सावंत हा आहे. 

वोट्समध्ये सूरज चव्हाण हाच धमाल करत असल्याचे सांगितले जातंय. वोट्समध्ये अंकिता वालावलकर आणि सूरज चव्हाण यांच्यामध्ये जोरदार टक्कर ही बघायला मिळतंय. धनंजय पोवार हे चाैथ्या स्थानावर आहे. निकी तांबोळी ही पाचव्या आणि जान्हवी किल्लेकर ही सहाव्या स्थानावर वोटिंग ट्रेंडमध्ये आहेत. आता बिग बॉसचा विजेता नेमका कोण होणार याबद्दल लवकरच खुलासा होईल. 

सुरूवातीपासूनच लोक हे सूरज चव्हाण याला जोरदार सपोर्ट करताना दिसत आहेत. जवळपास सर्वच आठवड्यांमध्ये सूरज चव्हाण हा नॉमिनेशनमध्ये जाताना दिसतो. मात्र, तो सुरक्षित राहत असत. सूरज चव्हाण हा बिग बॉसच्या घरातील सर्वात प्रामाणिक सदस्य आहे. सूरज चव्हाण याच्यामुळे अभिजीत सावंत याच्यावर अन्याय होत असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे.