Bigg Boss ott 3 मध्ये अरमानचा दुसऱ्या पत्नीसोबत रोमान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल

| Updated on: Jul 09, 2024 | 12:29 PM

Bigg Boss ott 3 Armaan Malik Romance: एका बाईचा संसार मोडून ही चारित्र्यहीन बाई..., अरमान मलिक याचा दुसऱ्या पत्नीसोबत 'बिग बॉस'च्या घरात रोमान्स, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा संताप, सध्या सर्वत्र अरमान आणि कृतिका यांच्या खासगी व्हिडीओची चर्चा...

Bigg Boss ott 3 मध्ये अरमानचा दुसऱ्या पत्नीसोबत रोमान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल
Follow us on

‘बिग बॉस ओटीटी 3’ फक्त युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या पत्नींमुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर देखील अरमान याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगलेली असते. अरमान मलिक याची पहिली पत्नी पायल मलिक घरातून बाहेर गेल्यानंतर अरमान आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीमध्ये रोमान्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकताच झालेल्या ‘विक एन्ड का वार’नंतर देखील अरमान आणि कृतिका यांच्यातील प्रेम कमी झालेलं नाही.

सध्या सोशल मीडियावर अरमान आणि कृतिका यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दोघे रोमान्स करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये दोघांमध्ये असलेलं प्रेम पाहायला मिळत आहे. व्हिडीओ बिग बॉसच्या फॅन क्लबमध्ये सामिल करण्यात आला आहे. व्हिडीओ लाईक्स आणि कमेंट करत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

काही नेटकऱ्यांनी अरमान – कृतिका यांचा व्हिडीओ आवडला आहे. तर काही नेटकऱ्यांनी मात्र कृतिकावर निशाणा साधला आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘एका महिलेचा संसार मोडून ही चारित्र्यहीन बाई असंच सगळं करणार…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘कपल चांगलं नाही… अरमानला बिग बॉसमधून काढा…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘पायलला किती वाईट वाटत असले…’, चौथा नेटकरी म्हणाला, ‘पायलला परत बोलवा…’ सध्या सर्वत्र व्हिडीओ व्हायरल होत आहे.

अरमानच्या दुसऱ्या लग्नावर पायलची प्रतिक्रिया

‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर पायलने एका मुलाखतीत मनातील खंत व्यक्त केली. ‘माझ्यासोबत वाईट झालं… माझ्यावर अन्याय झाला. पण आता मी सर्वकाही विसरली आहे. अरमान माझ्यावर कृतिकावर प्रचंड प्रेम करतो. मी याला फसवणूक झाली असं सांगणार नाही. पण जे काही झालं ते चुकीचं होतं…’ असं देखील पायल मुलाखतीत म्हणाली होती.

पायल हिने कुटुंबियांच्या विरोधात जावून 2011 मध्ये अरमान याच्यासोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर पायल हिने मुलगा चिरायू याला जन्म दिला. त्यानंतर 2018 मध्ये अरमान याने पायल हिला घटस्फोट न देता कृतिका हिच्यासोबत दुसरं लग्न केलं. 2022 मध्ये अरमान याने दोन्ही पत्नी गरोदर असल्याची घोषणा केली. अरमान याला चार मुलं आहेत. चिरायू, तूबा, अयान आणि झैद… अशी अरमान याचा मुलांची नावे आहेत.