अरमान मलिक आणि लवकेश कटारिया नव्हेतर चक्क ‘ही’ व्यक्ती बनली बिग बॉसच्या घराची कॅप्टन, लोक हैराण

| Updated on: Jul 13, 2024 | 2:42 PM

बिग बॉस ओटीटी 3 हे चांगलेच चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉस ओटीटी 3 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळत आहे. हे सीजन धमाका करताना दिसत आहे. आता बिग बॉसच्या घरात असे काही घडले की, प्रेक्षकही हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे.

अरमान मलिक आणि लवकेश कटारिया नव्हेतर चक्क ही व्यक्ती बनली बिग बॉसच्या घराची कॅप्टन, लोक हैराण
Armaan Malik and Lavkesh Kataria
Follow us on

बिग बॉस ओटीटी 3 मध्ये धमाका होताना दिसत आहे. बिग बॉस ओटीटी 3 प्रेक्षकांना चांगलेच मनोरंजन करताना दिसत आहे. अरमान मलिक आणि विशाल पांडे यांचे जोरदार भांडणे घरात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अरमान मलिक याच्या पत्नीबद्दल अत्यंत चुकीचे विधान विशाल पांडे याने केले होते, ज्यानंतर घरात मोठा वाद बघायला मिळाला. मुळात म्हणजे आता घरात काही ग्रुपही तयार झाले. विशाल पांडे याने अरमानच्या पत्नीबद्दल केलेल्या विधानानंतर घरातील लोकांनी त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवल्याचे बघायला मिळतंय.

बिग बॉस ओटीटी 3 ला पहिला कॅप्टन मिळाल्याचे सांगितले जातंय. रिपोर्टनुसार अरमान मलिक किंवा लवकेश कटारिया हे नाहीतर चक्क दुसरीच व्यक्ती बिग बॉस ओटीटी 3 च्या घराची कॅप्टन बनली आहे. यामुळे आता प्रेक्षकही चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. जी व्यक्ती बिग बॉस ओटीटी 3 मध्ये जास्त सक्रिय देखील नाहीये अशी व्यक्ती कॅप्टन झाल्याने सर्वचजण हैराण झाले.

बिग बॉस ओटीटी 3 ची कॅप्टन सना मकबूल झाल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. मात्र, याबद्दल अजून काही खुलासा हा होऊ शकला नाहीये. व्हायरल होणाऱ्या पोस्टनंतर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एका युजर्सने या पोस्टवर कमेंट करत म्हटले की, आता हिला विजेता देखील बनवा.

दुसऱ्या यूजरने लिहिले की, कटारिया बाहेरचा माणूस म्हणून चांगले काम करत आहे. तिसऱ्याने लिहिले की, बाहेरच्या व्यक्तीची ही कृपा आहे. अजून एकाने लिहिले की, न काहीही करत हिला जसे कॅप्टन बनवले तसेच हिला आता तुम्ही बिग बॉसचा विजेता देखील बनवा. सना कॅप्टन बनल्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

बिग बॉसचे हे सीजन प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन करताना दिसत आहे. घरात मोठे हंगामेही बघायला मिळाले. पायल मलिक आणि सना यांच्यात देखील मोठा वाद होणार असल्याचे प्रोमोमध्ये बघायला मिळत आहे. पायल मलिक ही बिग बॉसच्या मंचावर काही दिवसांपूर्वीच आली होती, तिने विशाल पांडे याचे चांगलीच पोलखोल केल्याचे बघायला मिळाले.