‘बिग बॉस’ सुरु झाल्यानंतर सर्वत्र शोची आणि स्पर्धकांची चर्चा सुरु असते. काही दिवसांपूर्वी ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोची (Bigg Boss OTT 3) सुरुवात झाली आहे. शोमध्ये सर्वात चर्चेत असणारे स्पर्धक युट्यूबर अरमान मलिक आणि त्याच्या दोन पत्नी… अरमान याची पहिली पत्नी पायल मलिक शोमधून बाहेर झाली आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर एका मुलाखतीत पायल हिने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. पती अरमान याने दुसरं लग्न केल्यानंतर पायलने स्वतःची काय अवस्था झाली होती, याबद्दल सांगितलं. पतीच्या दुसऱ्या लग्नानंतर पायल हिचे स्वतःला संपवण्याचा देखील विचार केला होता.
स्वतःवर झालेले अन्याय सांगत पायल म्हणाली, ‘माझ्यावर अन्याय तर झाला आहे. कारण अरमानसाठी मी माझं घर, माझे आई – वडील सोडून आली होती. मी पूर्णपणे अरमानवर निर्भर होती. 8 वर्ष मी अरमानसोबत संसार केला आणि अचनाक हे सर्व माझ्यासाठी फार धक्कादायक होता. त्याच्या आयुष्यात माझ्याशिवाय कोणी दुसरं आहे… हा तर माझ्यावर अन्याय झाला…’
‘आज आम्ही एक कुटुंब म्हणून राहात असलो तरी अरमानची पहिली पत्नी मी आहे आणि कृतिका नंतर… हे सत्य सर्वांना माहिती आहे. अरमानने दुसरं लग्न करावं अशी माझी इच्छा कधीच नव्हती. तेव्हा नाती खराब झाली होची. मी 1 वर्ष सर्व संबंध तोडले होते. चिकूला घेवून वेगळी झाली होती. स्वतःला संपवण्याचा देखील विचार केला. पण मुलामुळे नाही करु शकली..’
पुढे पायल म्हणाली, ‘अखेर पुन्हा एकत्र आलो, नाती पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला. अरमान आणि मुलावर असलेल्या प्रेमामुळे मी पुन्हा आमच्या लग्नाला नवीन संधी दिली…’ असं देखील पायल म्हणाली. सध्या सर्वत्र पायल हिची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील पायल हिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात.
‘बिग बॉस’च्या घरातून पहिल्याच आठवड्यात बाहेर झाल्यानंतर पायल म्हणाली, ‘मला माहिती आहे, मी मतांमुळे घराबाहेर झालेली नाही. घरातल्यांमुळे मी बाहेर आली आहे. मला घरात्यांनी नॉमिनेट केलं होतं म्हणून मी आज घराबाहेर आहे. नाहीतर, मी आणखी चांगलं खेळू शकली असती. लोकांना माहिती आहे की मी कशी आहे…’ असं देखील पायल म्हणाली.