बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी सध्या विवादित शो ‘बिग बॉस ओटीटी 3’ (Bigg Boss OTT 3) मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. शोमध्ये चाहत्यांना देखील अभिनेत्याचा नवीन रुप पाहायला मिळत आहे. काही स्पर्धकांसोबत रणवीर यांचे चांगले संबंध तयार झाले आहेत, तर काही स्पर्धकांसोबत सतत रणवीर याची भांडणं होताना दिसत आहेत. शोमध्ये येण्यापूर्वी रणवीरने सांगितले होते की, त्याला दरवर्षी या शोमधून ऑफर आल्या आणि या वर्षी तो का आला? हे देखील अभिनेत्याने सांगितलं.
सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस’च्या घरात रणवीर त्याच्या खासगी आयुष्याबद्दल दोखील बोलतना दिसत आहे. नुकताच, रणवीर याने पहिली पत्नी आणि अभिनेत्री कोंकना सेन शर्मा हिच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल आणि घटस्फोटाबद्दल सांगितलं आहे. शोमध्ये रणवीर काही स्पर्धकांसोबत बसला होता.
स्पर्धक एकत्र बसलेले असताना कृतिका हिने अभिनेत्याला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल विचारलं. यावर रणवीर म्हणाला, आमचं लग्न 2005 मध्ये झालं होतं. 2005 मध्ये आम्ही दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 2015 मध्या आमचा घटस्फोट झाला..
रणवीर याने घटस्फोटाबद्दल सांगितल्यानंतर शिवानी कुमारी हैराण होते आणि मुलाबद्दल प्रश्न विचारते. यावर रणवीर म्हणतो, ‘आम्हाला एक मुलगा आहे. काही दिवस मुलगा माझ्यासोबत असतो. तर काही दिवस त्याच्या आईसोबत…’ पुढे शिवानी हिने घटस्फोट का घेतला असा प्रश्न अभिनेत्याला विचरला.
यावर रणवीर म्हणाला, ‘कारण मी माझ्या करारामध्ये लिहिलं आहे. याठिकाणी मी सांगू शकत नाही., माझ्या लग्नाचा करार, माझ्या घटस्फोटाच्या करारामध्ये लिहिला आहे…’ असं देखील अभिनेता विनोदी अंदाजात म्हणाला… जेवढं दुःख जिने माझ्याकडून घटस्फोट घेतला तिला झालं नाही, तेवढं दुःख तुला आता होत आहे…’ असं देखील रणवीर, शिवानी हिला मस्करीत म्हणाला.
रणवीर शौरी आणि कोंकना सेन शर्मा यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, सप्टेंबर 2010 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर मार्च 2011 मध्ये कोंकनाने मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर देखील दोघांमधील वाद मिटले नाहीत. अखेर दोघांना विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
लग्नाच्या पाच वर्षांनंतर रणवीर शौरी आणि कोंकना सेन शर्मा यांनी विभक्त होत असल्याचं जाहीर केलं. लग्नाच्या दहा वर्षांनंतर 2020 मध्ये कोंकना आणि रणवीरने घटस्फोट घेतला. दोघांनी 2006 मध्ये ‘मिक्स्ड डबल्स’ आणि 2007 मध्ये ‘आजा नचले’ या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं.