Bigg Boss OTT 3 Grand Finale: ‘बिग बॉस ओटीटी 3’ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोचा ग्रँड फिनाले मोठ्या थाटात रंगणार आहे. त्यामुळे ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोची ट्रॉफी कोण घरी घेऊन जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोसाठी सना मकबूल आणि रणबीर शौरी यांना दमदार दावेदार समजलं जात आहे. दोघांमध्ये कांटे की टक्कर असल्याचं मानलं जात आहे. 43 दिवस एकत्र एकाच घरात राहिल्यानंतर ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोची ट्रॉफी कोणाच्या नावावर होते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी 3’ कुठे, कधी पाहू शकता याबद्दल सर्वकाही जाणून घेऊ…
विशाल पांडे बाहेर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ माजली होती. सोशल मीडियावर चाहत्यांचा संताप देखील पाहायला मिळाला, शिवानी कुमारी, विशाल पांडे आणि लवकेश कटारिया शोमधून बाहेर पडल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे. तर अरमान मलिक याच्या एविक्शनला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. आता ट्रॉफी आणि बक्षीस रक्कमेसाठी रणवीर, सना, नेजी (नावेद शेख), साई केतन राव आणि कृतिका मलिक यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. . 2 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजता जीओ सिनेमावर तुम्ही ग्रँड फिनाले पाहू शकता.
बिग बॉसच्या चमकदार ट्रॉफी शिवाय, ‘बिग बॉस ओटीटी’ सीझन 3 च्या विजेत्याला जिंकल्यानंतर 25 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहे. या रकमेचा उल्लेख ‘बिग बॉस’च्या घरात अनेकदा करण्यात आला आहे. रणबीर याने अनेकदा ट्रॉफीपेक्षा जास्त माझ्यासाठी मिळणाऱ्या रकमेचं महत्त्व अधिक आहे. कारण अभिनेत्याच्या खांद्यावर 13 वर्षीय मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी आहे. रणबीर याला त्याच्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवायचं आहे.
सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगत असलेल्या चर्चांनुसार, सना मकबूल शोची विजेती होऊ शकते. तर नेजी आणि रणबीर शौरी यांना रनर-अप सांगितलं जात आहे. सना हिने पूर्ण सीझनमध्ये स्वतःचं मत योग्य प्रकारे मांडलं. नेजी याने 42 दिवस कोणासोबत कारण नसताना भांडण केलं नाही शिवाय कोणाला टोमणे देखील मारले नाहीत आणि कोणाला भडकवलं देखील नाही…
रणबीर शौरी देखील दमदार स्पर्धक आहे. सर्वात सीनियर आणि शांत व्यक्तीमत्व म्हणून रणबीर याने ‘बिग बॉस’च्या घरात स्वतःची ओळख तयार केली आहे. त्यामुळे आता कोण ‘बिग बॉस ओटीटी’ सीझन 3 ची ट्रॉफी आणि 25 लाख रुपये घेऊन जातं… हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.