बिग बॉस ओटीटी 3 चा फिनाले झाला असून सना मकबूल ही बिग बॉस ओटीटी 3 ची विजेता झालीये. बिग बॉस जिंकल्यानंतर सना मकबूल ही तूफान चर्चेत आहे. मात्र, सना मकबूल हिने केलेल्या विधानानंतर लोक आता तिला चांगलेच खडेबोल सुनावताना दिसत आहेत. हेच नाही तर लोकांनी सना मकबूल हिच्या विरोधात सोशल मीडियावर काही पोस्टही शेअर केल्या आहेत. बिग बॉस ओटीटी 3 जिंकल्यानंतर सना मकबूल हिला 25 लाख रूपये मिळाले आहेत. सना मकबूल ही गेल्या काही वर्षांपासून श्रीकांत बुरेड्डी याला डेट करतंय. विशेष म्हणजे तो फिनालेच्या दिवशीही पोहोचला होता.
श्रीकांत बुरेड्डी याच्यासोबत जिंकल्यानंतर सना मकबूल ही फोटो काढताना देखील दिसली होती. फक्त श्रीकांत बुरेड्डी हाच नाही तर सना मकबूल हिचे कुटुंबिय देखील यावेळी उपस्थित हेते. श्रीकांत बुरेड्डी याच्या गाडीमध्येच बसून फिनाले जिंकल्यानंतर सना मकबूल ही घरी निघाली. यावेळी पुढच्या सीटवर सना मकबूल ही बसली होती तर मागच्या सीटवर श्रीकांत बुरेड्डी हा बसला होता.
यावेळी श्रीकांत बुरेड्डी याला विचारण्यात आले होते की, सना मकबूल आणि तुम्ही लग्न कधी करणार आहात? यावर लाजत श्रीकांत बुरेड्डी याने म्हटले होते की, लवकरच…आणि तुम्हाला देखील त्याबद्दल सांगू…यानंतर तूफान चर्चा रंगताना दिसली की, श्रीकांत बुरेड्डी याच्यासोबत लवकरच सना मकबूल ही लग्न करणार आहे.
सना मकबूल हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. मात्र, या मुलाखतीमध्ये सना मकबूल ही हैराण करणारे खुलासे करताना दिसली. सना मकबूल हिचे हे बोलणे ऐकून लोक चांगलेच हैराण झाल्याचे देखील बघायला मिळाले. सना मकबूल हिला विचारण्यात आले की, श्रीकांत बुरेड्डी याच्यासोबत लग्न कधी करणार आहे?
यावर सना मकबूल ही थेट म्हणाली की, कोण श्रीकांत? पुढे सना मकबूल म्हणाली की, मी आणि श्रीकांत बुरेड्डी फक्त मित्र आहोत. श्रीकांत बुरेड्डी हा माझी सपोर्ट सिस्टम आहे. त्याने मला नेहमीच प्रत्येक गोष्टीसाठी सपोर्ट केलाय. श्रीकांत बुरेड्डी हा कायमच माझा बेस्ट बडी असेल. सनाच्या या विधानानंतर लोक तिला चांगलेच खडेबोल सुनावताना दिसत आहेत.