बिग बॉस सीजन 18 चांगलेच धमाका करताना दिसत आहे. सलमान खान हाच या सीजनला होस्ट करताना दिसतोय. सलमान खानचे अत्यंत जवळचे मित्र आणि एनसीपी नेता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवेळी सलमान खान बिग बॉस 18 चेच शूटिंग करत होता. सलमान खानला जसे ही बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे कळाले तसे त्याने लीलावती रूग्णालय गाठले. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान खूप चांगलेच मित्र होते. बाबा सिद्दीकी यांच्या निधनानंतर सलमान खानला मोठा धक्का बसला. हेच नाही तर सलमान खानला देखील सतत जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. सलमान याने मोठ्या सुरक्षेत बिग बॉस 18 ची विकेंडचा वार नुकताच होस्ट केलाय.
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली. हेच नाही तर आता सलमान खान सुरक्षेच्या कारणामुळे बिग बॉसला होस्ट करताना दिसणार नसल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतर सलमानने विकेंडचा वार होस्ट केलाय. बिग बॉसच्या घरात जोरदार राडा होताना दिसतोय. मोठा वाद बिग बॉस सीजन 18 मध्ये झाल्याचे नुकताच बघायला मिळाले.
अविनाश मिश्रा आणि चाहत पांडे हे दोघे सुरूवातीपासूनच चांगले चर्चेत आल्याचे बघायला मिळतंय. आता नुकताच एक प्रोमो बिग बॉसचा सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या प्रोमोमध्ये अविनाश मिश्रा आणि चाहत पांडे यांच्यात जोरदार वाद होताना दिसतोय. हेच नाही तर दोघांमधील भांडणे वाढल्याचे बघायला मिळतंय.
जेलची शिक्षा अविनाश मिश्रा याला देण्यात आलीये. जेलमध्ये अविनाश मिश्रा हा झोपलेला असताना चाहत ही त्याच्या अंगावर पाणी फेकते. यानंतर अविनाश मिश्रा हा उठतो. यानंतर अविनाश हा म्हणतो की, मला माहित आहे की चाहतच्या हृदयात कुठेतरी माझ्यासाठी खूप प्रेम आहे. म्हणूनच तिला मला ओल्या केसांमध्ये पाहायचे आहे. तिला माझे भिजलेले शरीर बघायचे असल्यानेच तिने माझ्या अंगावर पाणी फेकले.
अविनाशचे हे बोलणे ऐकून चाहत चांगलीच संतापताना दिसलीये. चाहत ही अविनाशला थेट म्हणते की, माझ्या पायातील चप्पल देखील तुझ्यावर प्रेम करणार नाही. मी तुझ्यावर प्रेम करते असे तू नॅशनल टीव्हीवर सांगून एका मुलीची इज्जत काढत आहेस. मी तुझ्यासारख्या आणि तुझ्यासारखे विचार असलेल्या मुलांवर थुंकते, असेही तिने म्हटले. आता त्याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.