अशाप्रकारे एल्विश यादव याच्या ‘सापाच्या विषाच्या पार्टी’ची झाली भांडाफोड, ग्राहक बनून थेट

| Updated on: Nov 03, 2023 | 8:52 PM

एल्विश यादव हा सध्या तूफान चर्चेत आहे. एल्विश यादव याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मात्र, सध्या एल्विश यादव हा मोठ्या वादात सापडलाय. एल्विश यादव याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

अशाप्रकारे एल्विश यादव याच्या सापाच्या विषाच्या पार्टीची झाली भांडाफोड, ग्राहक बनून थेट
Follow us on

मुंबई : एल्विश यादव याच्यावर होणारे आरोप पाहून लोक हैराण झाले आहेत. कालपर्यंत एल्विश यादव हा चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसला. मुळात म्हणजे एल्विश यादव याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मात्र, सध्या सतत त्याच्यावर गंभीर आरोप केले जात आहे. एका रेव्ह पार्टीचे प्रकरण एल्विशच्या चांगलेच अंगलट आल्याचे बघायला मिळतंय. इतकेच नाही तर थेट त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

धक्कादायक म्हणजे एल्विश यादव याचा शोध तब्बल तीन राज्यांमध्ये पोलिसांकडून घेतला जातोय. केंव्हाही पोलिस हे एल्विश यादव याला अटक करू शकतात. मात्र, अजूनही पोलिसांच्या हाती एल्विश यादव हा लागला नाहीये. एल्विश यादव याच्या रेव्ह पार्टीमध्ये चक्क विदेशी मुलींना मागवण्यात आले. या पार्टीत कोबरासारख्या सापांच्या विषाची नशा केली जात.

हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. मोठा सापळा रचून या प्रकरणाची भांडाफोड करण्यात आल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे या पार्टीचे सत्य जगासमोर आणण्यासाठी एका एनसीओचा एक सदस्य थेट एल्विश यादव याच्या संपर्कात होता आणि तिच लूक एल्विश यादव याच्याकडून झाली आणि या पार्टीचे सत्य जगासमोर आले.

या व्यक्तीला एल्विश यादव याने पार्टीसाठी थेट त्याच्या एंजटचा नंबर देखील दिला. यानंतर यापार्टीबद्दल थेट नोएडा डीएफओला माहिती देण्यात आली. यानंतर सर्व भांडाफोड झाली. असा एक गंभीर आरोप होतोय की, एल्विश यादव याच्या सांगण्यावरूच पार्ट्यांमध्ये साप आणि त्यांचे विष पुरवले जायचे. गंभीर बाब अनेक साप देखीस जप्त करण्यात आली आहेत.

सर्पदंशाची नशा घेताना एखाद्या व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो. मज्जासंस्थेवर परिणाम करणाऱ्या सापांच्या विषाचा वापर केला जातो. सुरूवातीला अगदी कमी प्रमाणात सापाचे विश हे इंजेक्शनच्या माध्यमातून टोचवले जाते. परंतू काही काळानंतर त्याचे प्रमाण वाढवले जाते. मात्र, यादरम्यान एखाद्या व्यक्तीचे निधन होण्याची देखील दाट शक्यता आहे.

एल्विश यादव याने काही वेळापूर्वीच एक व्हिडीओ शेअर करत मोठा खुलासा केलाय. मात्र, अजूनही पोलिस हे एल्विश यादव याचा शोध घेत आहेत. याप्रकरणात थेट एल्विश यादव याच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल झालाय. इतर आरोपांनी पोलिसांनी ताब्यात देखील घेतलंय. मात्र, एल्विश यादव याचा अजूनही शोध सुरूच आहे.