Salman Kham – Salim Khan: जो कोणी सलमान खान याची मदत करेले, त्याने आपला हिशेब करुन ठेवायचा… असं धमकी देखील गुंड लॉरेन्स बिश्नोई याने जेष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. सांगायचं झालं तर, काळवीट शिकार प्रकरणी सलमान बिश्नोई गँग आणि समाजाच्या निशाण्यावर आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा देखील वाढवण्यात आली आहे. पण आता बिष्णोई समाजाने सलमान खान आणि वडील सलीम खान यांचे पुतळे जाळत आंदोलन केलं आहे.
सलीम खान यांच्या एक वक्तव्यामुळे बिश्नोई समाजात वातावरण तापलं आहे. सलमान खान निर्दोष आहे आणि त्याने काळवीट शिकार केली नाही… असं वक्तव्य सलीम खान यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. बिश्नोई धर्म स्थापना दिनानिमित्त काही आंदोलकांनी सलमान खान आणि सलीम खान यांचे पुतळे जाळत निषेध व्यक्त केला आहे.
जोधपूरच्या वेगवेगळ्या भागात आंदोलक जमा झाले होते. यावेळी सलीम खान यांच्या वक्तव्यावर समाजातील लोकांनी आक्षेप घेतला आहे. ‘जर सलमान खान निर्दोष आहे तर त्याला मुंबई, दिल्ली आणि जोधपूर याठिकाणी केससाठी वकिलांना गरज का भासली?’ असे प्रश्न देखील बिश्नोई समाजाकडून व्यक्त करण्यात आले आहेत.
सलमान खान आणि सलीम खान यांच्याविरोधात निदर्शने करत समाजातील लोकांनी पुन्हा माफी मागण्याची मागणी केली आहे. तसेच सलमानने माफी न मागितल्यास सनातन हिंदू समाज त्याच्याविरोधात आंदोलन करेल. असा इशाराही दिला.
सलीम खान म्हणाले होते, ‘माझ्या मुलाने कधी झुरळ देखील मारला नाही. तो काळवीटाची शिकार कशी करेल? सलमान खान याने कोणत्याच प्राण्याची शिकार केलेलीन नाही. त्याने काही चूक केली नसेल तर तो माफी का मागेल. काही कारण नसताना सतत त्याला धमक्या मिळत आहेत…’ सलीम खान यांचं वक्तव्य सर्वत्र व्हायरल झालं होतं.
एका जुन्या मुलाखतीत सलमान खान याने या प्रकरणावर वक्तव्य केलं होतं. ‘एक घाबरलेलं हरीण मला दिसला. तेव्हा त्याला बिस्किटे खायला दिली आणि थोडे पाणी दिलं. त्यानंतर तो तेथून पळून गेला…’ असं सलमान खान म्हणाला होता. पण सध्या सलमान खान याला सतत जीवेमारण्याच्या धमक्या मिळत आहेत.