Kareena Kapoor | जेव्हा बॉबी देओल याच्या पत्नीने करीना कपूर हिच्या लगावली कानशिलात; बेबोने देखील घेतला बदला

| Updated on: Jul 02, 2023 | 2:04 PM

करीना कपूर हिच्यासोबत असलेल्या वादासाठी बॉबी देओल याला मोजावी लागली मोठी किंमत; अभिनेत्याच्या पत्नीने बेबोला कानशिलात लगावली आणि...

Kareena Kapoor | जेव्हा बॉबी देओल याच्या पत्नीने करीना कपूर हिच्या लगावली कानशिलात; बेबोने देखील घेतला बदला
Follow us on

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. गेल्या दोन दशकांपासून अभिनेत्री झगमगत्या विश्वात सक्रिय आहे. करीना हिने अनेक सिनेमांमध्ये फक्त काम केलं नाही तर, वेग-वेगळ्या भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही अभिनेत्री फक्त आणि फक्त तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चर्चेत असते. पण एक काळ असा होता, जेव्हा करीना तिच्या अंहकारामुळे आणि इतर कलाकारांसोबत असलेल्या भांडणांमुळे चर्चेत आली होती. आजही अभिनेत्रीचे इतर कलाकारांसोबत असलेली भांडणं समोर येत असतात. करीना कपूर हिचं तिच्या सह-कलाकारांसोबत सतत भांडणं व्हायची असं देखील अनेकदा समोर आलं.

करीना कपूर आणि अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) यांच्यातील वादाची चर्चा रंगली होती. पण दोघींच्या वादामध्ये असं काही झालं, जेव्हा अभिनेता बॉबी देओल (Bobby Deol) याची पत्नी तान्या देओल (Tanya Deol) हिने करीनाच्या कानशिलात लागली होती. अभिनेत्याच्या पत्नीने बेबोच्या कानशिलात लगावली, पण त्याची मोठी किंमत अभिनेत्याला मोजावी लागली होती.

२००१ साली जेव्हा बॉबी, करीना आणि बिपाशा ‘अजनबी’ सिनेमाची शुटिंग करत होते. तेव्हा बिपाशा आणि करीना यांच्यातील वाद टोकाला पोहोचला होता. या भांडणात मारहाण देखील झाली होती. पण यावर कधी करीना कपूर आणि बॉबी देओल यांनी वक्तव्य केलं नाही. पण हे प्रकरण आजही चर्चेत आहे.

काही रिपोर्ट्सनुसार, बॉबीची पत्नी तान्या बिपाशाला सेटवर कॉस्च्युममध्ये मदत करायची. अशा परिस्थितीत एकदा सेटवर करिनाची आई बबिता देखील आल्या होत्या. बबिता कोणत्या तरी कारणामुले बिपाशावर रागावल्या होत्या. दरम्यान, बबिता यांनी बॉबी याच्यावर निशाणा साधत बोलण्यास सुरुवात केली. हे ऐकून तान्याला राग आला आणि तिने करीनाच्या आईला बडबड केली.

आईसोबत तान्याने केलेली वागणूक करीना कपूर हिला बिलकूल आवडली नाही आणि दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. मिळालेल्या माहितीनुसार दोघींच्या भांडणाची चर्चा पूर्ण बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये पसरली. पण संधी मिळताच तान्या देओल हिच्यासोबत झालेल्या वादाचा बदला अभिनेत्रीने बॉबी देओल याच्यासोबत घेतला.

‘जब वी मेट’ या सिनेमासाठी इम्तियाज अलीने मुख्य भूमिकेत बॉबीची निवड केली. पण करीना कपूरमुळे नंतर बॉबीची जागा शाहिद कपूरने घेतली. ‘जब वी मेट’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमा केला. शिवाय शहिद कपूर आणि करीना यांच्या जोडीला देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.