बॉलिवूड अभिनेता आमिर खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. आमिर खानची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आमिर खान याचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, त्याच्या या चित्रपटाला म्हणावा तसा धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. आमिर खानची लेक इरा खान हिने काही दिवसांपूर्वीच नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न केले. विशेष म्हणजे लेकीच्या लग्नात धमाल करताना आमिर खान हा दिसला. इरा खान हिने काही दिवस नुपूर शिखरे याला डेट केले आणि मग त्याच्यासोबत लग्न केले. नुपूर आणि इरा खान यांचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.
आता नुकताच आमिर खान याच्या लेकीने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. आमिर खानचा जावई नुपूर शिखरे याचा आज वाढदिवस आहे. पतीच्या वाढदिवसानिमित्त इरा हिने खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीये. आता इरा खान हिची ही पोस्ट व्हायरल होत आहे. अनेकजण या पोस्टवर कमेंट करताना दिसत आहेत.
इरा खान हिने लिहिले की, तू माझ्या आयुष्यातील सर्वात आवडती गोष्ट आहेस निर्णय आणि अनुभव … सर्व काही, तू मला हसवतोस, तू मला धरून ठेवतोस, तू मला समजावतोस. काळजी म्हणजे काय हे तू मला आठवण करून देतोस आणि तू अशी जागा तयार करतोस जिथे मी निश्चिंत राहू शकते. वाढदिवसाच्या शुभेच्छा…
या पोस्टसोबतच इरा खान हिने अनेक फोटो नुपूर शिखरे याच्यासोबतचे शेअर केले आहेत. दोघेही फोटोंमध्ये एकदम आनंदात दिसत आहेत. आता इरा खान हिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इरा खान ही सोशल मीडियावर कायमच नुपूर शिखरे याच्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
लग्नाच्या अगोदरही तिने नुपूर शिखरे याच्यासोबत बिकिनीवरील एक फोटो शेअर केला होता. ज्यानंतर तिच्यावर जोरदार टीका ही करण्यात आली होती. 3 जानेवारी 2024 रोजी नुपूर आणि इरा यांनी कोर्ट मॅरेज केले. 10 जानेवारीला त्यांनी उदयपूरमध्ये ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले. इरा खान ही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणार नाहीये.