अभिनेता आमिर खान याची पहिली पत्नी रिना दत्ता हिच्या वडिलांचं निधन झालं आहे. पण रिना हिच्या वडिलांचं निधन का झालं? यामागचं कारण कळू शकलेलं नाही. रिना दत्ता हिच्या वडिलांनी बुधवारी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनानंतर रिना हिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रिना हिच्या कठिण काळात आमिर खान पहिल्या पत्नीच्या कुटुंबासोबत आहे. रिना हिच्या वडिलांबद्दल सांगायचं झालं तर, तिने वडील पूर्वी एअर इंडियामध्ये वरिष्ठ अधिकारी होते.
वडिलांच्या निधनानंतर रिना हिच्या कुटुंबात दुःखाचं वातावरण आहे. फक्त आमिर खानच नाही तर त्याची वृद्ध आई झीनत हुसैन या देखील रिना दत्ता हिच्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी पोहोचल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.
रिना दत्ता हिच्या वडिलांच्या निधनानंतर सोशल मीडियावर काही भावूक करणारे व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. व्हिडीओवर चाहते श्रद्धांजली वाहत आहे. सध्या सर्वत्र रिना दत्ता हिच्या वडिलांच्या निधनाची चर्चा रंगली आहे.
आमिर खान आणि रिना दत्ता यांनी 1986 मध्ये गुपचूप लग्न केलं. लग्नानंतर आमिर आणि रिना यांनी मुलगा आणि मुलीचं जगात स्वागत केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2002 मध्ये रिना आणि आमिर यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर देखील आमिर कुटुंबासोबत असतो.