Aamir Khan | आमिर खान याने घेतला अत्यंत मोठा निर्णय, थेट अभिनेता सोडणार मुंबई, धक्कादायक निर्णय

| Updated on: Oct 20, 2023 | 5:21 PM

आमिर खान हा कायमच चर्चेत असणारा अभिनेता आहे. आमिर खान याचा काही दिवसांपूर्वीच लाल सिंह चड्ढा हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. तेंव्हापासून आमिर मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

Aamir Khan | आमिर खान याने घेतला अत्यंत मोठा निर्णय, थेट अभिनेता सोडणार मुंबई, धक्कादायक निर्णय
Follow us on

मुंबई : आमिर खान हा कायमच चर्चेत राहणारा बाॅलिवूड (Bollywood) अभिनेता आहे. आमिर खान याने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. सोशल मीडियावर आमिर खान याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग (Fan following) ही बघायला मिळते. आमिर खान याचा काही दिवसांपूर्वीच लाल सिंह चड्ढा (Laal Singh Chaddha) हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, आमिर खान याच्या या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात अजिबात यश मिळाले नाही. परिणामी हा चित्रपट फ्लाॅप गेला.

लाल सिंह चड्ढा या चित्रपटाकडून आमिर खान याला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, चित्रपट फ्लाॅप गेल्याने मोठा झटका आमिर खान याला नक्कीच बसला. लाल सिंह चड्ढा चित्रपट फ्लाॅप गेल्यानंतर आमिर खान याने अत्यंत मोठा निर्णय घेतला. यानंतर आमिर खान याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले.

आमिर खान याने जाहिर केले की, काही वर्षांपासून सतत चित्रपटांमध्ये काम करत असल्याने कुटुंबियांना म्हणावा तसा वेळ अजिबातच देऊ शकलो नाहीये. यामुळेच आता पुढील काही दिवस कुटुंबियांना वेळ देण्याचा निर्णय घेतलाय. लाल सिंह चड्ढानंतर आमिर खान हा मोठ्या पडद्यापासून दूर गेला. इतकेच नाही तर तो फार जास्त सक्रिय देखील दिसत नाहीये.

आता आमिर खान याने अत्यंत मोठा निर्णय घेतला. यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे दिसतंय. आमिर खान हा मुंबई सोडून थेट चेन्नईमध्ये शिफ्ट होणार आहे. रिपोर्टनुसार आमिर खान हा सध्या चेन्नईमध्येच असून तो लवकरच मुंबई सोडून जाणार आहे. तो चेन्नईमध्ये राहणार आहे. यामुळे चाहते हैराण झाले.

आमिर खान याने हा निर्णय त्याची आई जीनत हुसैन हिच्यामुळे घेतलाय. आमिर खान याच्या आईवर सध्या चेन्नईमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे तो चेन्नईमध्ये असून तो जास्तीत जास्त वेळ आपल्या आईसोबत घालू इच्छित आहे. आता आमिर खान हा चेन्नईला गिफ्ट होणार असल्याचे त्याच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने सांगितले आहे.

सध्या आमिर खान हा तेथील हाॅटेलमध्ये राहत असून तो चेन्नईमध्ये शिफ्ट होणार आहे. आमिर खान याच्या या निर्णयानंतर चाहते हैराण झाल्याच बघायला मिळतंय. इतकेच नाही तर आमिर खान मुंबईमध्ये कधी परतणार याबद्दल देखील काहीच अपडेट मिळू शकले नाहीये.