ऐश्वर्या राय हे सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. ऐश्वर्या रायची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय मोठ्या संपत्तीची मालकीन देखील आहे. ऐश्वर्या राय हिने फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडमध्येही आपला जलवा दाखवला आहे. ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांचे लग्न 2007 मध्ये झाले. विशेष म्हणजे त्यावेळीचे हे सर्वाधिक चर्चेत असणारे लग्न होते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना एक मुलगी असून त्यांच्या मुलगीचे नाव आराध्या आहे.
अभिषेक बच्चन याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन हा ऐश्वर्या राय हिच्याबद्दल बोलताना दिसलाय. अभिषेक बच्चन याने या मुलाखतीमध्ये सांगितले की, ज्यावेळी तो पूर्णपणे तुटलेला होता, त्यावेळी पत्नी ऐश्वर्या रायने कशाप्रकारे त्याची कानउघडणी केली. त्या स्थितीमधून तो कसा बाहेर पडला. याबद्दलच बोलताना आता अभिषेक बच्चन दिसला.
अभिषेक बच्चन म्हणाला की, कोरोनाची लागण झाल्यामुळे मला रुग्णालयातून बरे होऊन येण्यास एक महिन्याचा कालावधी लागला. घरी आल्यावर मी तणावात होतो, कारण माझ्या हातामध्ये काहीच प्रोजेक्ट्स नव्हते. काही कमावत नसल्याची चिंता मला सतावत होती. मी तणावात गेलो आणि आतून स्वत:ला खात होतो. हे माझ्या वागण्यातून दिसून येत होते.
अभिषेक बच्चन याची ही अवस्था पाहून ऐश्वर्या राय हिने त्याला अत्यंत कठोर शब्दांमध्ये सुनावले. ऐश्वर्या राय अभिषेकला म्हणाली की, अशा आव्हानात्मक काळातही तुझे कुटुंब आनंदी आणि सुरक्षित आहे, याबद्दल आभार मानायला हवेत. कारण प्रत्येकजण तुझ्याजवळ आहे, मग काळजी नेमकी कशाची वाटत आहे?
यासर्व गोष्टी नसल्यामुळे इतर लोकांना किती त्रास सहन करावा लागतो याची जाणीवही ऐश्वर्या राय हिने अभिषेक बच्चन याला करून दिली. त्यानंतर आपण सर्व गोष्टींकडे कशाप्रकारे बघितले हे देखील सांगताना अभिषेक बच्चन हा दिसला. अभिषेक बच्चन हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय दिसतो. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना कायमच अभिषेक बच्चन हा दिसतो.