बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अजयचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. अजय हा सध्या आपल्या आगामी चित्रपटाचे शूटिंग विदेशात करतोय. विशेष म्हणजे अजय देवगणला बॉलिवूडमध्ये 33 वर्ष पूर्ण होत आहेत. अजय देवगणने ज्या चित्रपटातून डेब्यू केला, तोच चित्रपट सुपरहिट ठरला. अजय देवगण याने तेंव्हापासून आयुष्यात कधीच मागे वळून बघितले नाही. अजय देवगण सोशल मीडियाच्या माध्यमातून कायमच त्याच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना देखील दिसतो. अजय देवगण मोठ्या संपत्तीचा मालक आहे.
अजय देवगण याचा 2017 मध्ये रिलीज झालेला ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटामध्ये कुणाल खेमू, अर्शद वारसी, तुषार कपूर, श्रेयस तळपदे, तब्बू, परिणीती चोप्रा यांनीही धमाकेदार भूमिका केल्या. या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड तोडले. विशेष म्हणजे अजय देवगण याचेही चित्रपटासाठी काैतुक करण्यात आले.
काही दिवसांरपूर्वीच अजय देवगण याने एका मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा खुलासा केला. अजय देवगण म्हणाला की, गोलमाल अगेन हा चित्रपट आम्ही घरी सर्वजण पाहत होतो. यावेळी चित्रपटामध्ये परिणीती चोप्राच्या कॅरेक्टरचे निधन होते. यावेळी माझा मुलगा युग हा दु:खी होऊन खूप जास्त रडत होता. युगला रडताना पाहून आम्ही सर्वजण हसत होतो.
मी त्यावेळी युगला विचारले की, काय झाले? त्यानंतर युगने माझ्या कानाखाली मारत थेट म्हटले की, तुम्ही मला बोलू नका. मात्र, काहीही झाले तरीही काजोल आणि निसा यांचे हसणे बंद करत नव्हत्या. काही दिवसांपूर्वीच काजोल हिने तिच्या घरी जवळच्या मित्र मैत्रिणींना जेवण्यासाठी बोलावले होते. खास फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले.