माधुरी दीक्षितसाठी स्वत:ला दिले सिगारेटचे चटके; अजय देवगणचा मोठा खुलासा, तो..

| Updated on: Jun 15, 2024 | 3:59 PM

माधुरी दीक्षित हिने चित्रपटांमध्ये मोठा काळ गाजवला आहे. माधुरी दीक्षितची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. माधुरी दीक्षित हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. विशेष म्हणजे माधुरी दीक्षित आणि अजय देवगणची जोडी लोकांना प्रचंड आवडलेली आहे.

माधुरी दीक्षितसाठी स्वत:ला दिले सिगारेटचे चटके; अजय देवगणचा मोठा खुलासा, तो..
Ajay Devgn and Madhuri Dixit
Follow us on

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. माधुरी दीक्षितचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. माधुरी दीक्षित सोशल मीडियावरही सक्रिय दिसतंय. माधुरी दीक्षितचा 56 वा वाढदिवस डान्स रियलिटी शो डान्स दिवानेमध्ये साजरा कण्यात आला. हेच नाही तर यावेळी माधुरी दीक्षितचे पती श्रीराम लेले यांनी शोमध्ये येत तिला मोठे सरप्राईज दिले. यासोबतच तिच्या दोन्ही मुलांनी खास व्हिडीओ शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या. माधुरी दीक्षितचे दोन्ही मुले विदेशात राहतात आणि माधुरी भारतात पतीसोबत आलीये.

माधुरी दीक्षित हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्यांसोबत काम केले. अजय देवगण आणि माधुरी दीक्षित यांनी ‘ये रास्ते हैं प्यार के’ या चित्रपटात एकसोबत काम केले. हा चित्रपट 2001 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला. सर्वात विशेष म्हणजे लोकांना माधुरी दीक्षित आणि अजय देवगण यांनी केमिस्ट्री जबरदस्त आवडली.

अजय देवगण याने माधुरी दीक्षित हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला. अजय देवगण म्हणाला की, चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी आम्ही सर्वजण बसलो होतो आणि तिथे माधुरी दीक्षित आली. ती इतकी जास्त सुंदर दिसत होती की, मी तिच्याकडेच बघत राहिलो. त्यावेळी माझ्या हातामध्ये सिगारेट होती आणि माझ्या लक्षातच राहिले नाही की, आपल्या हातात सिगारेट आहे.

त्यावेळी माझा चेहरा थोडासा जळाला, हेच नाही तर माझ्या चेहऱ्यावर आजही तो निशाण आहे. ज्यावेळी अजय देवगण याने हा किस्सा सांगितले, त्यावेळी तिथे माधुरी दीक्षित ही देखील उपस्थित होती. अजय देवगण याचे हे बोलणे ऐकून माधुरी दीक्षित ही हसायला लागते. आता हा किस्सा जोरदार चर्चेत असल्याचे बघायला मिळत आहे.

अजय देवगण याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. आता लवकरच अजय देवगण हा ‘सिंघम अगेन’ चित्रपटात दिसणार आहे. अजय देवगण याचा हा चित्रपट धमाका करेल असेही सांगितले जात आहे. अजय देवगण हा सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय दिसतो आणि आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतो.