मुंबई : अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला अनेक बाॅलिवूड कलाकार हे पोहचले आहेत. खास निमंत्रण कलाकारांना या सोहळ्याचे मिळाले. संपूर्ण देशात अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा उत्साह हा बघायला मिळतोय. कालच काही बाॅलिवूड कलाकार हे अयोध्येत दाखल झाले. यामध्ये अमिताभ बच्चन, जॅकी श्रॉफ, आलिया भट्ट, रणबीर कपूर, विवेक ओबेरॉय, सोनू निगम, कतरिना कैफ, विकी कौशल, माधुरी दीक्षित, कंगना राणावत हे कलाकार पोहचले आहेत. आता या सोहळ्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याचे निमंत्रण हे अक्षय कुमार याला देखील होते. मात्र, या अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला अक्षय कुमार हा पोहचला नाहीये. आता अक्षय कुमार याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अत्यंत महत्वाची माहिती ही शेअर करताना अक्षय कुमार हा दिसतोय.
विशेष म्हणजे या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार याच्यासोबत टायगर श्रॉफ हा देखील दिसतोय. अक्षय कुमार याने म्हटले की, जय श्रीराम…राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सर्वांना खूप शुभेच्छा…जय श्री राम…माझ्यासोबत आणि टायगर श्रॉफ आहे. आम्हा दोघांकडून तुम्हा खूप साऱ्या शुभेच्छा… जगभरातील राम भक्तांसाठी आजचा दिवस खूप मोठा आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा दिवस आला आहे की राम लल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य मंदिरात येत आहेत. अक्षय कुमार हा त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असल्याने तो या अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेच्या सोहळ्याला पोहचू शकला नाहीये. याच्याबद्दलच माहिती देताना अक्षय कुमार हा दिसतोय.
बडे मियां छोटे मियांच्या शूटिंगमध्ये अक्षय कुमार हा व्यस्त आहे. आता सोशल मीडियावर अक्षय कुमार याचा हा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. चाहते हे अक्षय कुमार याच्या या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. अक्षय कुमार याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत.