बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अमिताभ बच्चन हे आज कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. हेच नाही तर एक मोठा काळ अमिताभ बच्चन यांनी चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन कायमच सोशल मीडियावर सक्रिय देखील दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना अमिताभ बच्चन दिसतात. अमिताभ बच्चन कोट्यवधी लोकांच्या मनावर राज्य करतात. काही दिवसांपूर्वीच गुडबाय हा चित्रपट अमिताभ बच्चन यांचा प्रेक्षकांच्या भेटीला आला.
काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी अयोध्यामध्ये मोठी जमीन खरेदी केली. या जमिनीची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. नवनवीन प्राॅपर्टी खरेदी करताना अमिताभ बच्चन हे दिसत आहेत. आता अमिताभ बच्चन यांनी अजून एक नवीन जमीन खरेदी केलीये. विशेष म्हणजे ही जमीन खरेदी करण्यासाठी अमिताभ बच्चन यांना कोट्यवधी रूपये हे मोजावे लागले आहेत.
अमिताभ बच्चन यांनी ‘द हाउस ऑफ अभिनंदन लोढा’ यांच्याकडून अलिबागमध्ये तब्बल 10 कोटींमध्ये 10,000 चौरस फूट जमीन विकत घेतली आहे. गेल्याच आठवड्यात या व्यवहाराची नोंद करण्यात आल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सुरू झालेल्या अलिबागमधील 20 एकरच्या प्लॉट डेव्हलपमेंटमध्ये अमिताभ बच्चन यांनी ही जमीन खरेदी केली आहे.
अमिताभ बच्चन यांनी ‘द शरयू’ या प्रकल्पात याच बिल्डरकडून अयोध्येत जमीन खरेदी केली होती. सतत जमिनीची खरेदी करताना अमिताभ बच्चन हे दिसत आहेत. फक्त अमिताभ बच्चन हे नाही तर अनेक बाॅलिवूड कलाकारांची घरे आलिबागला आहेत. काही दिवसांपूर्वी रणबीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांनी देखील एक बंगला आलिबागला खरेदी केलाय.
बरेच बाॅलिवूड कलाकार हे सुट्ट्यांमध्ये आलिबागला राहणे पसंद करतात. मोठ्या प्रमाणात लोक आलिबागला जमिनीचे व्यवहार करताना दिसत आहेत. त्यामध्ये आता मोठी जमीन अमिताभ बच्चन यांनी आलिबागला खरेदी केलीये. अमिताभ बच्चन हे आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत जुहू येथे राहतात. अनेक शहरांमध्ये अमिताभ बच्चन यांची प्राॅपर्टी आहे. मोठ्या संपत्तीचे मालक अमिताभ बच्चन हे आहेत.