अमिताभ बच्चन यांनी मागितली प्रभासच्या चाहत्यांची माफी, थेट म्हणाले, मी हात जोडून…

| Updated on: Jun 24, 2024 | 6:33 PM

अमिताभ बच्चन यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचे हे चित्रपट मोठा धमाका करताना देखील दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन यांनी नुकताच माफी मागितली आहे.

अमिताभ बच्चन यांनी मागितली प्रभासच्या चाहत्यांची माफी, थेट म्हणाले, मी हात जोडून...
Amitabh Bachchan and Prabhas
Follow us on

बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचे हे चित्रपट मोठा धमाका करताना देखील दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये बॉलिवूडला अनेक मोठी चित्रपट दिली आहेत. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय दिसतात. आपल्याला चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही अमिताभ बच्चन दिसतात. अमिताभ बच्चन यांचा ‘कल्कि 2898 AD’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. विशेष म्हणजे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ दिसत आहे.

कल्कि 2898 AD या चित्रपटात अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पादुकोण हे धमाका करताना दिसणार आहेत. हा चित्रपट सुपरहिट ठरेल, असेही सांगितले जातंय. नुकताच या चित्रपटाचा एक कार्यक्रम मुंबईमध्ये झाला. यावेळी प्रभासची तक्रार करताना अमिताभ बच्चन हे दिसले. हेच नाही तर चक्क अमिताभ बच्चन यांनी म्हटले होते की, प्रभास मला त्याच्या पाया पडू देत नाही.

नुकताच आता अमिताभ बच्चन यांनी प्रभासच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. कल्कि 2898 AD चित्रपटात अमिताभ बच्चन हे अश्वत्थामाच्या भूमिकेत आहेत. प्रभास हा भैरवच्या भूमिकेत आहे. दीपिका पादुकोण ही भगवान विष्णुच्या अवतारमध्ये आहे. कल्कि 2898 AD ला अमिताभ बच्चन हे प्रमोट करताना दिसत आहेत.

कल्कि 2898 AD च्या निर्मात्यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये चित्रपटाचे कलाकार हे प्रोड्यूसरसोबत बोलताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी म्हटले की, डायरेक्टरने चित्रपटासाठी अश्वत्थामा आणि भैरवचे कॉन्सेप्ट दाखवले. अमिताभ बच्चन पुढे म्हणाले की, त्यांचे पात्र तर तगडा माणूस द प्रभास रगडत आहे.

त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी थेट म्हटले की, प्रभासच्या सर्व चाहत्यांनी प्लीज मला माफ करावे. मी हात जोडून माफी मागत आहे. चित्रपट बघितल्यानंतर माझा जीव घेऊ नका. हे ऐकून प्रभास आणि इतर लोक हसायला लागतात. पुढे प्रभास म्हणाला की, माझे जितके चाहते आहेत ते सर्व आमिताभ बच्चन यांचेही चाहते आहेत.