अमिताभ बच्चन यांचे अत्यंत मोठे विधान, थेट म्हणाले, माणूस चुकांमधूनच…

| Updated on: Aug 28, 2024 | 1:37 PM

अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे त्यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही अमिताभ बच्चन दिसतात. मोठा काळ त्यांनी चित्रपटामध्ये गाजवला आहे.

अमिताभ बच्चन यांचे अत्यंत मोठे विधान, थेट म्हणाले, माणूस चुकांमधूनच...
Amitabh Bachchan
Follow us on

बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे काैन बनेगा करोडपतीचे नवीन सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे सेटवरील खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सतत शेअर करताना दिसत आहेत. हेच नाही तर या वयातही काम करण्याचे कारण सांगताना अमिताभ बच्चन हे काही दिवसांपूर्वीच दिसले. माझ्या जागी कोणी जरी असते तर काम सोडले नसल्याचे अमिताभ बच्चन यांनी म्हटले. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. अमिताभ बच्चन कितीही व्यवस्थ असले तरीही व्लॉगच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात.

आता नुकताच काैन बनेगा करोडपतीच्या सेटवर कृष्णा सेलूकर हा पोहोचला. यावेळी कृष्णा सेलूकर याने मोठा खुलासा केला. काैन बनेगा करोडपतीच्या सेटवर आल्यावर कृष्णा सेलूकर याने आपला संघर्ष सांगितला. यावेळी कृष्णा सेलूकर हा भावूक होताना देखील दिसला. कृष्णा सेलूकर याचे बोलणे ऐकून बिग बीही भावूक झाले.

कृष्णा सेलूकर म्हणाला की, मी कधीच वडिलांच्या हातामध्ये माझा पगार देऊ शकलो नाही. जेंव्हा तरूण मुलगा घरी येतो त्यावेळी सर्वांनाच आनंद होतो. मात्र, तोच तरूण मुलगा दोन ते तीन महिने घरी राहतो, त्यावेळी तो घरच्यांना ओझे होतो. कृष्णा सेलूकर याने शोमध्ये जिंकलेला चेक वडिलांच्या हातात दिला.

अमिताभ बच्चन यांनी कृष्णाच्या वडिलांना समजून सांगितले की, ते म्हणाले कोणता व्यक्ती असा आहे, जो चूक करत नाही? चुकीमधून जो व्यक्ती उठतो आणि पुढे जातो तेच महत्वाचे आहे. तुमच्या मुलामध्ये नक्कीच काहीतरी वेगळे आहे. तो जिंकू आला आहे. अमिताभ बच्चन यांचे हे बोलणे ऐकून तिथे उपस्थित लोक टाळ्या वाजवताना दिसले.

यंदाच्या सीजनमध्ये निर्मात्यांकडून मोठे बदल करण्यात आले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून अमिताभ बच्चन हे या शोला होस्ट करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या सीजनची देखील चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ बॉलिवूडमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.