बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय ही सध्या तिच्या चित्रपटांपेक्षा अधिक खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलीये. ऐश्वर्या राय हिला तिच्या अभिनयासाठी नुकताच पुरस्कार मिळालाय. मात्र, अभिनेत्रीच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचेही सांगितले जातंय. अनंत अंबानी याच्या लग्नानंतर ऐश्वर्या राय ही विदेशात गेली. मात्र, नेहमीप्रमाणे यावेळी तिच्यासोबत मुलगी आराध्या बच्चन हीच फक्त होती. मुलगी आराध्या कायमच ऐश्वर्याच्यासोबत दिसते. यावरून ऐश्वर्या हिला प्रश्न देखील विचारण्यात आला. यावर सडेतोड उत्तर देताना ऐश्वर्या राय ही दिसली. ऐश्वर्या राय आणि अभिषेकच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू आहे.
ऐश्वर्या रायचे काैतुक करताना कायमच अमिताभ बच्चन हे दिसतात. विशेष म्हणजे ऐश्वर्या राय आणि अमिताभ बच्चन यांच्यात सून आणि सासऱ्याचे नाते नसून अमिताभ बच्चन हे ऐश्वर्याला मुलगी मानतात. जया बच्चन यांनी एका मुलाखतीमध्ये थेट म्हटले होते की, ऐश्वर्या ज्यावेळी घरात असते त्यावेळी अमिताभ बच्चन हे खूप जास्त आनंदी असतात.
अमिताभ बच्चन यांनी ऐश्वर्या राय हिच्याबद्दल मोठा खुलासा केला होता. आराध्या हिच्या जन्मानंतर सूनेबद्दल बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले होते की, मला खरोखरच ऐश्वर्याचे खूप जास्त काैतुक नक्कीच आहे. तिने प्रसूती वेदना 2 ते 3 तास सहन केल्या. पण ती तिच्या मतावर ठाम होती की, तिला नॉर्मल डिलिव्हरी हवी आहे.
खूप जास्त त्रास होत असतानाही तिने एपिड्युरल किंवा पेन किलर औषध घेतले नाहीत. हे पहिल्यांदा नव्हते की, अमिताभ बच्चन यांनी सून ऐश्वर्या राय हिचे काैतुक केले. कायमच अमिताभ बच्चन हे ऐश्वर्या राय हिचे काैतुक करताना दिसतात. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू असताना त्यावर अजिबातच भाष्य करताना अमिताभ बच्चन हे दिसले नाहीत.
हेच नाही तर ऐश्वर्या राय हिला IIFA अवॉर्ड्स 2024 मध्ये पुरस्कार मिळाला. यावेळी तिच्यासोबत बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही पोहोचले नव्हते. फक्त मुलगी आराध्या हिच्यासोबत ऐश्वर्या राय ही दिसली. हेच नाही तर पुरस्कार मिळाल्यानंतर ऐश्वर्याचे काैतुक करणारी एकही पोस्ट बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही सोशल मीडियावर शेअर केली नाही.