ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्येच अमिताभ बच्चन थेट म्हणाले, ‘एक शांत दिवस’…

| Updated on: Aug 18, 2024 | 8:47 PM

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे बिग बी देखील म्हटले जाते.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्येच अमिताभ बच्चन थेट म्हणाले, एक शांत दिवस...
Amitabh Bachchan
Follow us on

बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही अमिताभ बच्चन हे दिसतात. गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये.

अमिताभ बच्चन हे काैन बनेंगा करोडपतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. शोचे नवीन सीजन प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. गेल्या कित्येक वर्षांपासून अमिताभ बच्चन हे सतत चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी काैन बनेंगा करोडपती चित्रपटाच्या सेटवरील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.

अमिताभ बच्चन यांनी नुकताच त्यांच्या व्लॉगमध्ये लिहिले की, एक शांत दिवस…माझ्या शरीरावर आणि कुटुंबासोबत घालवला. गेले काही दिवस मी खूप जास्त स्टुडिओमध्ये बिझी होतो. आराम करण्यासाठी आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही. आपल्याला आपल्या प्रेक्षकांकडून प्रेरणा मिळत असल्याचेही अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या व्लॉगमध्ये म्हटले.

अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. अमिताभ बच्चन यांचा काही दिवसांपूर्वीच कल्कि 2898 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे या चित्रपटात अमिताभ बच्चन हे धमाका करताना दिसले. कल्कि 2898 चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रभास आणि दीपिका पादुकोण हे देखील महत्वाच्या भूमिकेत होते.

अमिताभ बच्चन यांचा काैन बनेंगा करोडपती शो धमाका करताना दिसतोय. विशेष म्हणजे चाहत्यांमध्ये काैन बनेंगा करोडपती शोबद्दल मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय. गेल्या कित्येक वर्षांपासून अमिताभ बच्चन या शोसोबत जोडले गेलेले आहेत. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय दिसतात. सोशल मीडियावर चाहत्यांचे काैतुक करतानाही दिसतात. काैन बनेंगा करोडपती शोमध्ये आलेला एक स्पर्धेक चक्क अमिताभ बच्चन यांना त्यांचे बूट मागताना दिसला.