बॉलिवूडचे बिग बी अर्थात अमिताभ बच्चन हे कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. अमिताभ बच्चन हे काैन बनेंगा करोडपतीचे नवीन सीजन घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी सेटवरील काही खास फोटोही शेअर केले. अमिताभ बच्चन यांचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना देखील दिसत आहेत. अमिताभ बच्चन हे काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोण आणि प्रभास यांच्यासोबत चित्रपटात धमाका करताना दिसले.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन हे कायमच आपल्या चाहत्यांसोबत काही खास गोष्टी शेअर करताना दिसतात. अमिताभ बच्चन यांनी नुकताच दोन फोटो शेअर केले आहेत. ते फोटो खूप जास्त जुने दिसत आहेत आणि त्यामध्ये शाळेतील मुले दिसत आहेत. या फोटोंची सर्वात खास बाब म्हणजे या फोटोंमध्ये चक्क अमिताभ बच्चन हे आहेत.
होय तुम्ही अगदी खरे ऐकले, जे फोटो अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केले. त्यामध्ये अमिताभ बच्चन हे देखील आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या शालेय जीवनातील हे फोटो शेअर केले. हे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडले असून या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेले हे फोटो तब्बल 70 वर्ष जुने आहेत. एक स्पर्धा जिंकल्यानंतर हे फोटो काढण्यात आले होते. अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेला एक फोटो ग्रुप फोटो आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये स्वत:अमिताभ बच्चन हे दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासोबतच इतरही बरेच विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक फोटोमध्ये दिसत आहेत. अमिताभ बच्चन शालेय जीवनात कसे दिसत होते, हे या फोटोमधून दिसत आहे.
एकाने लिहिले की, हे फोटो ज्यावेळी काढले जात होते, त्यावेळी कोणीतरी विचार केला होता का हा मुलगा इतका मोठा स्टार बनणार याचा? दुसऱ्याने लिहिले की, सर अशाप्रकारचे फोटो शेअर करत जा म्हणजे आम्हाला माहिती मिळेल की, तुम्ही शालेय जीवनात कसे दिसत होते. आता अमिताभ बच्चन यांनी शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच व्हायरल होताना दिसतंय.