बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अमिताभ बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. विशेष म्हणजे अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. अमिताभ बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला असून त्यांच्या चित्रपटांनी धमाका केलाय. काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांचा गूडबाय हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. बच्चन कुटुंबात मोठे वादळ आल्याचे सांगितले जातंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन घटस्फोट घेत असल्याची जोरदार चर्चा आहे.
यावर अमिताभ बच्चन यांनी काहीच भाष्य केले नाहीये. अमिताभ बच्चन हे लवकरच काैन बनेंगा करोडपतीचे 16 वे सीजन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या काैन बनेंगा करोडपतीच्या 16 व्या सीजनचे शूटिंग सुरू आहे. नुकताच याचेच काही फोटो आणि खास पोस्ट अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या व्लॉगमध्ये शेअर केलीये. आता ही पोस्ट तूफान व्हायरल होताना दिसत आहे. अमिताभ बच्चन यांची ही भावनिक पोस्ट आहे.
अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, गेममध्ये काही मोठे आणि चांगले बदल झाले आहेत. यामधून आपण काय नेमके शिकतो यावर परिणाम होईल. ज्यावेळी समोरचा व्यक्ती सांगतो की, तो कोणत्या परिस्थितीमधून आलाय. त्याने किती जास्त सहन केले आहे आणि त्यानंतर तो त्या खुर्चीवर बसलाय. पुढे अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, हे खरोखरच खूप जास्त भावनिक असते.
या महिला आणि पुरूषांचे आयुष्य पाहून खूप जास्त लाचार झाल्यासारखे वाटते. पंरतू त्यांचे हे हास्य पिघळून टाकते. गेल्या काही दिवसांपासून स्पर्धेक आणि त्यांच्या आयुष्यातील परिस्थिती आमच्यासमोर येत आहे, ती वेळ खरोखरच खूप जास्त भावनिक नक्कीच असते. पुढे अमिताभ बच्चन यांनी म्हटले की, त्यांच्या मदतीसाठी आम्ही साथ पुढे करतो, त्यांच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी मदत करतो.
अमिताभ बच्चन यांची ही पोस्ट पाहून चाहतेही भावनिक झाल्याचे बघायला मिळतंय. 12 ऑगस्टपासून काैन बनेंगा करोडपतीचे 16 वे सीजन सुरू होणार आहे. विशेष म्हणजे या सीजनमध्ये काही मोठे बदल करण्यात आल्याचेही सांगितले जातंय. चाहते हे या नव्या सीजनची आतुरतेने वाट पाहताना देखील दिसत आहेत. काैन बनेंगा करोडपती या शोने अनेकांचे आयुष्य बदलून टाकले आहे.