गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Oct 04, 2024 | 1:33 PM

Govinda discharged from hospital: रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच गोविंदा यांची पहिली प्रतिक्रिया समोर, अभिनेत्याला पाहिल्यानंतर चाहत्यांची चिंता मुक्त

गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया
Follow us on

मिसफायर झाल्यामुळे अभिनेता गोविंदा यांच्यावर अंधेरीतील क्रिटीकेअर रुग्णालयाच उपचार सुरू होते. मंगळवारी अभिनेत्याला गोळी लागली होती. आता गोविंदाची प्रकृती स्थिर असून, त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देखील मिळाला आहे. दुपारी 1 च्या सुमारास गोविंदाला डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर अभिनेत्याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अनेक दिवसांनंतर अभिनेत्याला पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील मोकळा श्वास घेतला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गोविंदा याची चर्चा रंगली आहे.

गोविंदा यांची पहिली प्रतिक्रिया

अनेक ठिकाणी पूजा – पाठ करण्यात आले. माझ्यासाठी अनेकांनी दुवा केल्या. त्यासाठी सर्वांचे आभार मानतो. माध्यमांचे, पोलिसांचे आणि प्रशासनाचे देखील आभार मानतो.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. विशेषतः माझ्यावर मनापासून प्रेम करणाऱ्यांचे आभार मानतो… तुमच्या कृपा आणि आशीर्वादामुळे मी सेफ आहे. तुमच्याकडून मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे… जय माता की…’ असं अभिनेता गोविंदा म्हणाला आहे.

हे सुद्धा वाचा

 

गोविंदाच्या प्रकृतीबद्दल डॉक्टरांनी दिली मोठी माहिती

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदाच्या डाव्या पायाच्या हाडाला दुखापत झाली आहे. अभिनेत्याला डिस्चार्ज मिळाला असला तरी स्वतःच्या पायावर उभं राहणं शक्य नाही. अभिनेत्याच्या पायातील गोळी काढण्यात आली असून अभिनेत्याला पूर्ण बपरं होण्यासाठी अद्याप 3 ते 4 आठवडे लागतील असं देखील डॉक्टरांनी सांगितलं आहे. काही दिवस अभिनेत्याला वॉकरचा आधार घ्यावा लागणार आहे. अशी माहिती देखील समोर येत आहे.