बाॅलिवूड अभिनेता अर्जुन कपूर हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अर्जुन कपूर हा मलायका अरोरा हिला डेट करतोय. नेहमीच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे स्पाॅट होताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा हे विदेशात धमाल करताना दिसले. अर्जुन कपूर आणि मलायकाचे विदेशातील अनेक फोटो व्हायरल होताना दिसले. मध्यंतरी चर्चा होती की, अर्जुन कपूर आणि मलायका लवकरच लग्न करणार आहेत. मात्र, यावर दोघांपैकी कोणीही भाष्य केले नाही.
अर्जुन कपूर हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. आपल्या चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर करताना दिसतो. आता नुकताच अर्जुन कपूर याने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केलीये. ही पोस्ट पाहून लोक हे अर्जुन कपूर याचे काैतुक करताना दिसत आहेत. अर्जुन कपूर हा एका मुलाच्या मदतीला धावून आल्याचे या पोस्टवर बघायला मिळतंय.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये एक मुलगा दिसतोय. हा मुलगा फक्त दहा वर्षाचा आहे आणि तो फूड स्टाॅल चालवत आहे. आपल्या आणि आपल्या बहिणीच्या पोटासाठी आणि शिक्षणासाठी हा मुलगा हे काम करत आहे. हेच नाही तर या मुलाच्या वडिलांचे निधन दहा दिवसांपूर्वीच झाले.
वडिलांच्या निधनानंतर त्यांचा फूड स्टाॅल हा मुलगा सांभाळत आहे. आता हा व्हिडीओ पाहून थेट अर्जुन कपूर हा या मुलाच्या मदतीला धावून आलाय. अर्जुन कपूर याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, मला या मुलाचा आणि त्याच्या बहिणीचा शिक्षणाचा खर्च उचलायचा आहे, प्लीज या मुलाचा काही संपर्क असेल तर मला कळवा.
आता अर्जुन कपूर याची हीच पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे. म्हणजेच काय तर या मुलाचा आणि त्याच्या बहिणीचा शिक्षणाचा खर्च अर्जुन कपूर करण्यास तयार आहे. यामुळेच चाहते हे अर्जुन कपूर याचे काैतुक करताना दिसत आहेत. अर्जुन कपूर याची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे.