मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : सलग तिसऱ्या दिवशी इस्रायलने गाझा पट्टीमधील हमासच्या तळांवर हवाई हल्ले सुरूच ठेवले आहेत. गाझा पट्टीतील सत्ताधारी ‘हमास’ या दहशतवादी गटाने शनिवारी पहाटे इस्रायलवर हल्ला केला होता. तर दुसरीकडे इस्रायलनेही प्रत्युत्तर म्हणून गाझा पट्टीवर हल्ला केला. या दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या युद्धादरम्यान अनेक भारतीय इस्रायलमध्ये अडकले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री नुशरत भरुचाला नुकतंच इस्रायलहून सुरक्षितरित्या भारतात आणलं गेलं. नुशरत इस्रायलमधल्या एका फिल्म फेस्टिव्हलला उपस्थित राहण्यासाठी गेली होती. मात्र तिच्याशी कुटुंबीयांचा संपर्क होत नव्हता. अखेर राजदूतांच्या मदतीने तिला भारतात आणलं गेलं. मुंबई विमानतळावरील नुशरतचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मात्र आता एका बॉलिवूड अभिनेत्याने तिच्या परतण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
या अभिनेत्याने ट्विट करत नुशरतवर संशय व्यक्त केला आहे. त्याच्या मते ती शनिवारीच भारतात आली होती. ‘नुशरत भरुचा शनिवारीच भारतात परत आली होती. मात्र रविवारी सकाळी तिने ही बातमी पसरवली की तिचा इस्रायलशी संपर्क तुटला आहे. एका तासानंतर तिने सांगितलं की ती सुरक्षित आहे आणि फ्लाइट पकडण्यासाठी एअरपोर्ट पोहोचतेय. त्याच्या एका तासाने तिने व्हिडीओ पोस्ट करत सांगितलं की ती मुंबईला पोहोचली. आता तुम्हीच अंदाज लावू शकता की ती किती ड्रामा क्वीन आणि निर्लज्ज आहे’, असं ट्विट त्या अभिनेत्याने केलं. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून कमाल आर. खान ऊर्फ केआरके आहे.
Nusrat Bharucha came back to India on Saturday. But on Sunday morning, she made a news that she has lost contact in Israel. After an hour, she made news that she is safe and reaching to airport to catch the flight. After an hour, she released a video that she has reached to…
— KRK (@kamaalrkhan) October 8, 2023
केआरकेच्या या ट्विटरवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘आपला आगामी चित्रपट प्रमोट करण्यासाठी तिने असं केलं असावं’, असं एकाने लिहिलं. तर ‘असंच तिच्या अकेली या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘ती अभिनेत्री असून प्रसिद्धीसाठी काहीही करू शकते’, अशीही टीका नेटकऱ्यांनी केली.
इस्रायलमध्ये नुकताच हायफा (HAIFA) पुरस्कार सोहळा पार पडला. यामध्ये नुशरतच्या ‘अकेली’ चित्रपटाचं स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं होतं. त्यानिमित्त ती तिथे गेली होती. मात्र तिच्याशी संपर्क होत नसल्याचं टीमने सांगितलं होतं. ॲम्बेसीसोबत संपर्क झाल्यानंतर नुशरत इस्रायल एअरपोर्टवर पोहोचली आणि त्यानंतर रविवारी दुपारी दोन वाजेपर्यंत एका कनेक्टिंग फ्लाइटने ती भारतात परतली. मुंबई एअरपोर्टवर आल्यानंतर नुशरतच्या चेहऱ्यावरील भीती स्पष्ट पाहायला मिळत होती.