बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा कायमच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. हृतिक रोशन हा सुझैन हिच्यासोबत घटस्फोट घेतल्यापासून सबा आझाद हिला डेट करतोय. हृतिक रोशन आणि सबाच्या वयामध्ये खूप मोठे अंतर आहे. सोशल मीडियावर हृतिक रोशन आणि सबाचे अनेक फोटो आणि व्हिडीओही बघायला मिळतात. हेच नाही तर हृतिक रोशनच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत खास अशी पोस्ट सबाने सोशल मीडियावर शेअर देखील केली होती. अनेकजण हृतिक रोशन आणि सबाच्या जोडीला मुलगी आणि वडिलांची जोडी बोलतात. काही दिवसांपूर्वीच विदेशात हृतिक आणि सबा खास वेळ घालवताना दिसले.
सबा आझाद हिने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अत्यंत मोठा खुलासा केला. सबा आझाद हिचे बोलणे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळाले. सबा आझाद हिने थेट म्हटले होते की, मी हृतिक रोशन याच्यासोबत रिलेशनमध्ये असल्याने मला काम मिळत नाहीये. मला माझा खर्च उचलणे देखील कठीण होत आहे.
एखाद्या मोठ्या अभिनेत्याला आपण ज्यावेळी डेट करतो, त्यावेळी लोक आपल्याकडे काम घेऊनही येत नाहीत. हेच नाही तर गेल्या काही दिवसांपासून पार्ट्यांमध्येही हृतिक आणि सबा एकत्र दिसत नाहीत. अनंत अंबानीच्या लग्नातही हृतिक रोशन हा एकटाच पोहोचला होता. यापूर्वी नेहमीच दोघे एकत्र असत.
अशी एक चर्चा आहे की, हृतिक रोशन आणि सबा आझाद यांचे ब्रेकअप झाले. सबा आझाद हिच्या करिअरसाठी हृतिक रोशन याने तिला सोडल्याचे सांगितले जातंय. करिअर महत्वाचे असल्याने या दोघांनी निर्णय घेतला. सबा आझाद ही हृतिक रोशन याच्यापेक्षा 12 वर्षाने लहान आहे. हृतिक रोशन याच्यासोबत रिलेशनमध्ये असल्यापासून तिला काम मिळत नाहीये.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हृतिक रोशन, त्याचे दोन्ही मुले आणि सबा आझाद हे विदेशात गेले होते. यावेळीचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. हृतिक रोशन याचा विमानतळावरील एक व्हिडीओ मध्यंतरी व्हायरल होताना दिसला. हृतिक रोशन हा चांगलाच भडकताना दिसला होता. हृतिक रोशनचे ते वागणे लोकांना अजिबातच आवडले नव्हते.