बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांपेक्षा अधिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत दिसतोय. ऋतिक रोशन हा सबा आझाद हिला डेट करतोय. काही दिवसांपूर्वीच ऋतिक रोशन याचा फायटर हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, ऋतिक रोशनच्या या चित्रपटाला अजिबात धमाल करण्यात यश मिळाले नाही. या चित्रपटात ऋतिक रोशन याच्यासोबत दीपिका पादुकोण ही मुख्य भूमिकेत दिसली. दोघेही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले. मात्र, असे असताना देखील चित्रपट फ्लॉप गेला.
ऋतिक रोशन हा लवकरच सबा आझाद हिच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर विदेशात काही दिवसांपूर्वीच धमाल करताना ऋतिक रोशन आणि सबा आझाद दिसले. ऋतिक रोशन आणि सबा आझाद दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो कायमच शेअर करताना दिसतात. अनेकदा हे पार्ट्यांमध्येही एकसोबत पोहचतात.
सध्या सोशल मीडियावर ऋतिक रोशन याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून ऋतिक रोशनच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलाय. ऋतिक रोशन याचा व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ विमानतळावरील आहे. यावेळी अभिनेता रागात दिसतोय. ऋतिक रोशन हा नेहमी कुल राहताना दिसतो.
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ऋतिक रोशन रागात दिसतोय. ऋतिक रोशन म्हणतो की, आरामात भाई…दुसऱ्या व्यक्तीला ऋतिक रोशन म्हणतो, इथे काहीतरी वेगळे घडत आहे. लोकांना ऋतिक रोशन याचा हा व्हिडीओ अजिबात आवडला नाहीये. अनेकांनी म्हटले की, सबासोबत भांडणे झाल्याने ऋतिक रोशन चिडचिड करताना दिसतोय.
ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांची जोडी अनेकांना आवडत नाही. हेच नाही तर फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर अनेक लोक यांना खडेबोल सुनावताना दिसतात. बऱ्याच वेळा ऋतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या जोडीला थेट मुलगी आणि बापाची जोडी देखील म्हटले जाते. सबा आझाद सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.