मुंबई : बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांचे 29 एप्रिल 2020 रोजी वयाच्या 54 व्या वर्षी निधन (Bollywood Actor Irrfan Khan died) झाले. त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान इरफान यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली. आजही इरफान यांचं निधन झालं आहे यावर चाहत्यांचा विश्वास बसत नाही. एक उत्तम कलाकार तीन वर्षांपूर्वी बॉलिवूडला सोडून गेल्यामुळे झगमगत्या विश्वाचं मोठं नुकसान झालं असं म्हणालया हरकत नाही. आजही त्यांच्या आठवणी चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. इरफान खान यांच्या निधनाला तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त करताना दिसत आहेत.
इरफान खान त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जायचे, परंतु अभिनेत्यांने 29 एप्रिल 2020 रोजी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. इरफान खान न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर या गंभीर आजाराने त्रस्त होते. जवळपास त्यांनी या आजाराशी दोन वर्ष लढा दिला. इरफान खान यांची आज तिसरी पुण्यतिथी आहे. सध्या सर्वत्र इरफान खान आणि त्यांच्या सिनेमाची चर्चा रंगत आहे.
इरफान खान यांचा जन्म 7 जानेवारी 1967 मध्ये राजस्थानमधील जयपूर येथे झाला. इरफान खान हे एम.ए. करत असताना त्यांना दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची शिष्यवृत्ती मिळाली. त्यानंतर त्यांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. ‘चाणक्य’ या हिंदी मालिकेद्वारे त्यांनी सिनेसृष्टीत पदापर्ण केलं. त्यानंतर इरफान खान यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही.
इरफार खान यांनी 1994 मध्ये द ग्रेट मराठा या मालिकेत रोहिल्ला सरदारची भूमिका साकारली होती. त्यानंतर 1988 मध्ये मीरा नायर यांचा सिनेमा ‘सलाम बॉम्बे’मधून त्यांनी बॉलीवूडमध्ये आपल्या करियरला सुरुवात केली. यासाठी ऑस्कर पुरस्कारासाठीही त्याचं नाव नॉमिनेट करण्यात आले होते.
इरफान खान यांनी आतापर्यंत अनेक हिंदी, इंग्रजी आणि बऱ्याच मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. 2011 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांनी आतापर्यंत जवळपास 30 पेक्षा बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे.
2017 ला प्रदर्शित झालेल्या हिंदी मीडियम या सिनेमा त्यांनी अतिशय उत्तम काम केलं. त्यासाठी त्यांनी उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कारही मिळाला होता. भारत आणि चीनमध्ये हा सिनेमा चांगलाच गाजला होता. हा सिनेमा डिजीटल माध्यमांद्वारे प्रसिद्ध झाला होता. दुदैवाने हा त्यांचा शेवटचा चित्रपट (Bollywood Actor Irrfan Khan died) ठरला.