मुंबई | 3 डिसेंबर 2023 : झगमगत्या विश्वात आतापर्यंत कर्करोगामुळे अनेक सेलिब्रिटींचं निधन झालं आहे. आता बॉलिवूडचा आणखी एक प्रसिद्ध अभिनेता मृत्यूच्या दारात आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे अभिनेत्याकडे फार कमी दिवस शिल्लक असल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आता जीवन-मरणाची लढाई लढत आहे. सध्या ज्या अभिनेत्याच्या प्रकृतीची चर्चा रंगली आहे तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून ‘ ब्रह्माचारी’ फेम अभिनेता ज्युनियर महमूद आहे. ज्युनियर महमूद गेल्या दोन महिन्यांपासून मृत्यूला झुंज देत आहे. प्रकृती गंभीर असताना अचानक त्यांचं वजक कमी होण्यास सुरुवात झाली. अशात आरोग्य चाचणी केल्यानंतर, ज्युनियर महमूद यांना कर्करोग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. ज्युनियर महमूद आता कर्करोगाच्या चौथ्या स्टेजवर आहेत.
रिपोर्टनुसार, ज्युनियर महमूद यांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांच्या आरोग्याबद्दल मोठी अपडेट दिली आहे. ‘सुरुवातीला ज्युनियर महमूद यांना किरकोळ त्रास व्हायचा. त्यानंतर अचानक त्यांचं वजन कमी होऊ लागलं. रिपोर्ट आल्यानंतर यकृत, फुफ्फुसात कर्करोग आणि आतड्यात गाठ असल्याचे सांगण्यात आलं. त्यांना कावीळही झाली होती. सध्या त्यांचे उपचार सुरू आहेत..’ ज्युनियर महमूद यांचा कर्करोग चौथ्या स्टेजवर असल्याची माहिती देखील डॉक्टरांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्युनियर महमूद यांच्या संपूर्ण शरीरात कॅन्सर पसरला आहे. ज्युनियर महमूद यांच्याकडे शेवटचे फक्त 40 दिवस शिल्लक असल्याची माहिती दिली आहे. ज्युनियर महमूद यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. अशात ज्युनियर महमूद यांना भेटण्यासाठी त्यांचे मित्र घरी जात आहेत….
नुकताच विनोदवीर जॉनी लिव्हर यांनी देखील ज्युनियर महमूद यांची भेट घेतली आहे. दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ज्युनियर महमूद आणि जॉनी लिव्हर यांच्या व्हिडीओची चर्चा रंगलेली आहे. व्हिडीओमध्ये ज्युनियर महमूद यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं चित्र दिसत आहे.
सांगायचं झालं तर, ज्युनियर महमूद यांचं खरं नाव नईम सैयद अस आहे. त्यांना विविध भाषांमध्ये तब्बल 200 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. ज्युनियर महमूद यांनी ब्रह्मचारी (1968), मेरा नाम जोकर (1970), परवरिश (1977), आणि दो और दो पांच (1980) यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये काम करत बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे.