‘एक वेळचं मिळायचं जेवण, स्वतःचं आयुष्य संपवण्यासाठी…’, मिथुन चक्रवर्ती यांच्या आयुष्यातील वाईट दिवस

| Updated on: Jul 21, 2023 | 2:17 PM

आज कोट्यवधींचे मालक असलेले मिथुन चक्रवर्ती यांनी स्वतःला संपवण्याचा केला होता विचार... अत्यंत वाईट दिवसातून पुढे आले आहेत अभिनेते मिथुन चक्रवर्ती...

एक वेळचं मिळायचं जेवण, स्वतःचं आयुष्य संपवण्यासाठी..., मिथुन चक्रवर्ती यांच्या आयुष्यातील वाईट दिवस
Follow us on

मुंबई | 21 जुलै 2023 : अभिनेते मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. पण यशाच्या उच्च शिखरावर पर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. एक वेळ अशी आली जेव्हा मिथुन चक्रवर्ती यांनी स्वतःचा जीव संपवण्याचा देखील विचार केला होता. आज मिथुन चक्रवर्ती यांच्या करियरबद्दल जाणून घेवू. मिथुन चक्रवर्ती यांनी ‘आर्ट हाउस ड्रामा मृगया’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘आर्ट हाउस ड्रामा मृगया’ या सिनेमासाठी मिथुन यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर मिथुन यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. मिथुन चक्रवर्ती यांनी सुरक्षा , साहस , वारदात , वांटेड , बॉक्सर , प्यार झुकता नहीं , प्यारी बहना, डिस्को डान्सर यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

आज मिथुन चक्रवर्ती यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फोर मोठी आहे. पण एक वेळी अशी होती जेव्हा मिथुन यांनी अनेक वाईट प्रसंगांचा सामना केला. एका मुलाखतीत मिथुन चक्रवर्ती यांनी मोठा खुलासा केला होता. आयुष्यात प्रत्येक जण स्ट्रगल करत असतो. पण माझा प्रवास फुटपाथवरुन सुरु झाला..

मिथुन चक्रवर्ती म्हणाले, ‘मुंबईमध्ये अनेक दिवस व्यतीत केल्यानंतर मी फाईव्ह गार्डनमध्ये झोपायचो. कधी-कधी हॉस्टेलच्या बाहेर झोपायचो. एकदा त्यांच्या एका मित्राने त्यांना माटुंगा जिमखान्याचे सदस्यत्व मिळवून दिले जेणेकरून त्यांना तेथील सुविधा वापरता याव्यात.’

हे सुद्धा वाचा

मिथुन चक्रवर्ती यांना संघर्षाच्या दिवसात आशा गमावली होती का? असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. यावर त्यांनी स्वतःला संपवण्याचा विचार देखील डोक्यात आला होता.. एक वेळचं जीवन मिळायचं… असं वक्तव्य केलं. राजकीय पार्श्‍वभूमीमुळे असल्यामुळे मिथुन चक्रवर्ती पुन्हा घरी देखील जावू शकत नव्हते.. असं देखील मिथुन चक्रवर्ती यांनी मुलाखतीत सांगितलं.

मिथुन चक्रवर्ती फक्त अभिनेतेच नाही तर, उद्योजक देखील आहेत. मिथुन चक्रवर्ती यांचे हॉटेल देखील आहेत. टीव्ही शोमधूनही त्यांनी चांगली कमाई केली आहे. मिथुन चक्रवर्ती यांनी आतापर्यंत 350 चित्रपटातून अभिनय केला आहे. 1989 मध्ये तर त्यांनी रेकॉर्ड केला होता. एकाच वर्षात त्यांचे 17 सिनेमा प्रदर्शित झाले होते.