Nana Patekar | ‘आम्ही खूप जुने झालोत, म्हणून…’, ७२ वर्षीय नाना पाटेकर असं का म्हणाले?

| Updated on: Sep 13, 2023 | 10:49 AM

Nana Patekar | इंडस्ट्रीचे दरवाजे नाना पाटेकर यांच्यासाठी बंद झाले आहेत? नाना पाटेकर यांच्या वक्तव्यानंतर सर्वत्र चर्चंना उधाण... नाना पाटेकर असं का म्हणाले?

Nana Patekar | आम्ही खूप जुने झालोत, म्हणून..., ७२ वर्षीय नाना पाटेकर असं का म्हणाले?
Follow us on

मुंबई : 13 सप्टेंबर 2023 | अभिनेते नाना पाटेकर यांनी आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आजही चाहते नाना पाटेकर यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत असतात. नाना पाटेकर यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. नाना पाटेकर यांचे सिनेमे चाहते तितक्याच आवडीने पाहत असतात. दरम्यान, अभिनेता अक्षय कुमार याने ‘वेलकम ३’ सिनेमाची घोषणा केली आहे. पण सिनेमात नाना पाटेकर नसल्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. ‘वेलकम’ सिनेमाच्या दोन भागांमध्ये नाना पाटेकर आणि अभिनेते अनिल कपूर यांच्या जोडीने चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता ‘वेलकम ३’ सिनेमामध्ये चाहत्यांना उदय आणि मजनू यांची जोडी अनुभवता येणार नाही.

‘वेलकम’ सिनेमात नाना पाटेकर यांनी उदय शेट्टी या भूमिकेला न्याय दिला होता. चाहत्यांनी त्यांच्या भूमिकेला डोक्यावर घेतलं. पण ‘वेलकम ३’ मध्ये नाना पाटेकर यांची भूमिका नसल्यामुळे त्यांचे चाहते नाराज झाल्याची चर्चा रंगत आहे. तर यावर नाना पाटेकर यांनी देखील मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र नाना पाटेकर यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ या सिनेमाद्वारे नाना पाटेकर मोठ्या पडद्यावर परतण्यासाठी सज्ज झाले आहेत. सिनेमाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी खुलासा केला. ”वेलकम टू द जंगल’ सिनेमासाठी मला विचारण्यात आलेलं नाही. आम्ही आता फार जुने झालो आहोत कदाचित त्यांना असं वाटत असेल.’

हे सुद्धा वाचा

पुढे विवेक अग्निहोत्री यांच्याकडे इशारा करत नाना पाटेकर म्हणाले, ‘यांना (विवेक अग्निहोत्री) नाही वाटत मी वृद्ध झालो आहे. म्हणून त्यांनी मला सिनेमात भूमिका साकारण्याची संधी दिली. हे इतकं सोपं नाही…’ सध्या सर्वत्र नाना पाटेकर यांची चर्चा रंगत आहेत.

इंडस्ट्रीबद्दल नाना पाटेकर म्हणाले…

‘इंडस्ट्रीचे दरवाजे कोणासाठी देखील बंद झालेले नाहीत. इंडस्ट्रीमध्ये कधीही दरवाजे बंद होत नाहीत. जर तुम्हाला काम करायचं असेल, तर तुम्हाला संधी मिळते. पण काम करायचं की नाही… हे तुम्हाला ठरवायचं असतं. माझ्या मते ही माझी शेवटची संधी आहे. प्रत्येकाकडे काम आहे, तुम्हाला ते करायचे की नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे.’ असं देखील नाना पाटेकर म्हणाले.

विवेक अग्निहोत्री यांच्या आगामी ‘द व्हॅक्सिन वॉर’ या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाची कथा महामारीच्या काळात COVID-19 लस तयार करण्याच्या शर्यतीत भारताच्या योगदानाभोवती फिरत आहे. सिनेमात अनुपम खेर, सप्तमी गौडा, पल्लवी जोशी, रायमा सेन, निवेदिता भट्टाचार्य यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. सिनेमा 28 सप्टेंबर 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.