Nana Patekar : ‘गेल्या 50 वर्षांपासून मला कोणीही…’, नाना पाटेकर यांचा मोठा खुलासा, व्यक्त केली खंत

| Updated on: Dec 11, 2023 | 10:08 AM

Nana Patekar : गेल्या 50 वर्षांपासून नाना पाटेकर यांनी केलाय 'या' गोष्टीचा सामना... अखेर त्यांनी खंत व्यक्त केलीच, नाना पाटेकर असं म्हणाले तरी काय? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नाना पाटेकर यांची चर्चा, नाना पाटेकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतात चर्चेत...

Nana Patekar : गेल्या 50 वर्षांपासून मला कोणीही..., नाना पाटेकर यांचा मोठा खुलासा, व्यक्त केली खंत
नाना पाटेकर
Follow us on

मुंबई | 11 डिसेंबर 2023 : गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेते नाना पाटेकर इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत. फक्त हिंदी नाही तर मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील नाना पाटेकर यांनी स्वतःचं स्थान भक्कम केलं आहे. नाना पाटेकर ‘द व्हॅक्सिन वॉर’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले. पण नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी एक खंत व्यक्त केली. त्यांनी मल्याळम फिल्म इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा केला आहे. गेल्या 50 वर्षांत केरळमधील एकाही दिग्दर्शकाने त्यांच्यासोबत सिनेमासाठी संपर्क साधला नाही… अशी खंत नाना पाटेकर यांनी  केरळच्या 28 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव उद्घाटन कार्यक्रमात  व्यक्त केली आहे.

नाना पाटेकर म्हणाले, ‘मला इथे आल्याचा सन्मान वाटत आहे. IFFK मध्ये आमंत्रित केल्यामुळे मी आयोजकांचे आभार मानतो. 32 वर्षांपूर्वी एका सिनेमाच्या शुटिंगसाठी मी केरळ याठिकाणी आलो होतो. तेव्हापासून सामाजिक-राजकीय परिस्थितीत काहीही बदल झालेले नाहीत. लोकं मनापासून अधिक विचार करतात. त्यामुळे भाषा वेगळ्या असल्या तरी बोलणं फार सोपं जातं… हे असंच असायला हवं…’ असं नाना पाटेकर म्हणाले.

महत्त्वाचं म्हणजे यावेळी नाना पाटेकर यांनी मल्याळम सिनेमांबद्दल असलेली त्यांची आवड देखील व्यक्त केली. एवढंच नाही तर, मल्याळम सिनेमांमध्ये काम करण्याची इच्छा देखील नाना पाटेकर यांनी व्यक्त केली. शिवाय, पाच दशकांच्या कारकिर्दीत मला मल्याळम सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली नाही. याबद्दल त्यांनी  खेद व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

खंत व्यक्त करत नाना पाटेकर म्हणाले, ‘गेल्या 50 वर्षात मला केरळ येथील एकाही दिग्दर्शकाना सिनेमासाठी संपर्क केला नाही. याचा अर्थ अभिनेता म्हणून मला माझ्यामध्ये काही सुधार करावे लागणार आहेत. मी माझे पूर्ण प्रयत्न करेल आणि तुम्हाला कधीही निराश करणार नाही…’ असा विश्वास नाना पाटेकर यांनी केरळ येथील दिग्दर्शकांना दिला.

नाना पाटेकर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी अनेक सिनेमांमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आज देखील चाहते नाना पाटेकर यांचं सिनेमे तितक्याच आवडीने पाहातात. एवढंच नाही तर, चाहते नाना पाटेकर यांच्या आगामी सिनेमांच्या देखील प्रतीक्षेत असतात.

एक काळ होता, जेव्हा नाना पाटेकर यांनी मोठ्या पडद्यावर राज्य केलं होतं. आजही नाना पाटेकर यांच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. सोशल मीडियावर देखील नाना  पाटेकर यांचे सिनेमातील काही सीन व्हायरल होत असतात. नाना पाटेकर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.