मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) गेल्या काही दिवसांपासून त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पहिली पत्नी आलिया सिद्दीकी आणि भावाने गंभीर आरोप केल्यानंतर अभिनेता वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अनेक दिवस नवाज आणि पहिली पत्नी आलिया यांच्यातील वादाच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगत होत्या. आता दोघांनी आपपसात वाद संपवण्याचा निर्णय घेतला आहे. याचदरम्यान नवाज याच्या एका मुलाखतीची चर्चा तुफान रंगत आहे. या मुलाखतीत अभिनेत्याने खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. सध्या सर्वत्र नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याची चर्चा आहे. मुलाखती दरम्यान अभिनेत्याने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला आहे. ‘सध्या मी मानसिक स्थितीचा सामना करत आहे आणि अचानक कोणाला न सांगता गायब होईल…’ असं वक्तव्य अभिनेत्याने केल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.
नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या आगामी सिनेमा ‘जोगीरा सारा रा रा’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) याने स्वतःच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला. अभिनेता म्हणाला, ‘एक व्यक्ती संपूर्ण जीवन स्वतःचा बचाव करत असतो. दुसऱ्यांना जज करत असतो. मला आता संन्यास घ्यायचा आहे… मी अभिनेता नसतो तर एक संन्यासी असतो…’
अभिनेता म्हणाला, ‘मी जावू शकतो… मी जाईल तेव्हाच तुम्हाला कळेल. मला शांत जागी जावून बसणं आणि चिंतन करायला आवडतं. मी लिहित नाही फक्त करतो… मी प्रत्येक ठिकाणी आनंदी राहतो. माझ्या अनुभवाचा काही भाग उपयोगी पडला तर मला आनंद होईल. मी माझ्या आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टी मिळवण्यासाठी उपाय केले आहेत पण मोठ्या गोष्टी मिळवण्याचा कोणताही मार्ग नाही. इथे फक्त प्रामाणिकपणा आणि मेहनत आहे.’ असं देखील अभिनेता म्हणाला…
नवाजुद्दीन सिद्दीकी याच्या आगामी सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘जोगीरा सारा रा रा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्याच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अभिनेता अभिनेत्री नेहा शर्मा हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नेहा शर्मा स्टारर ‘जोगीरा सारा रा रा’ सिनेमा १२ मे २०२३ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन कुशन नंदी यांनी केलं आहे.
नवाज कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. आता मात्र अभिनेता त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. संन्यास घ्यायची इच्छा व्यक्त केल्यानंतर सर्वत्र अभिनेत्याची चर्चा रंगत आहे.