Rajinikanth | रजनीकांत यांच्या शिक्षण, पर्सनॅलिटीवर अभिनेत्याने उपस्थित केला सवाल; भडकले चाहते

| Updated on: Jul 31, 2023 | 2:03 PM

रजनीकांत यांचे चित्रपट जरी लार्जर दॅन लाइफ असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते अत्यंत साधेपणानं राहतात. त्यांच्या अभिनयाचे आणि स्टाइलचे बरेच चाहते आहेत. पण त्यांचा साधेपणा आणि सहज वावर चाहत्यांना खूप भावतो. रजनीकांत यांच्याबद्दल लोकांमध्ये इतकी क्रेझ आहे की, ते दक्षिणेत अनेकजण त्यांना ‘देव’ मानतात.

Rajinikanth | रजनीकांत यांच्या शिक्षण, पर्सनॅलिटीवर अभिनेत्याने उपस्थित केला सवाल; भडकले चाहते
रजनीकांत
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई | 31 जुलै 2023 : साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. त्यांचं अभिनय, त्यांची स्टाइल यांची भुरळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत असल्याचं पहायला मिळतं. रजनीकांत यांनी इंडस्ट्रीत नाव कमाविण्यासाठी केवढी मेहनत केली, हे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र एका अभिनेत्याने नुकतंच ट्विट करत रजनीकांत यांच्या शिक्षणावर आणि दिसण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. अभिनेत्याच्या या ट्विटवर ‘थलायवा’चे चाहते चांगलेच भडकले आहेत. या ट्विटच्या कमेंट्समध्ये अनेकांनी अभिनेत्यावर ताशेरे ओढले आहेत.

रजनीकांत यांचा फोटो पोस्ट करत या अभिनेत्याने ट्विटरवर लिहिलं, ‘सुपरस्टार रजनीकांत हे याचा पुरावा आहेत की तुम्हाला सुपरस्टार बनण्यासाठी उंची, पर्सनॅलिटी, शिक्षण अशा गोष्टींची गरज नसते. तुमच्याकडे फक्त नशिब आणि ॲटिट्यूड असणं गरजेचं असतं.’ असं ट्विट करणारा हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून कमाल आर. खान आहे. केआरके याआधीही अनेकदा त्याच्या वादग्रस्त ट्विट्समुळे चर्चेत आला आहे. आता त्याने थेट रजनीकांत यांच्यावर निशाणा साधल्याने चाहते चांगलेच भडकले आहेत.

हे सुद्धा वाचा

‘त्यांनी सर्वकाही फक्त मेहनत, समर्पण आणि दृढनिश्चय यांच्या जोरावर कमावलंय. त्यांच्याबद्दल बोलायची तुझी लायकीही नाही’, अशा शब्दांत एकाने राग व्यक्त केला. तर ‘भावा, त्यांच्या आसपास पोहोचण्यासाठी तुझ्या सात पिढ्यांनाही शक्य होणार नाही’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘उंची आणि पर्सनॅलिटी तर तुझीही नाही. फक्त ॲटिट्यूड भरभरून आहे. मग तू सुपरस्टार का नाही झालास’, असा सवाल एका युजरने केला.

रजनीकांत यांचे चित्रपट जरी लार्जर दॅन लाइफ असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते अत्यंत साधेपणानं राहतात. त्यांच्या अभिनयाचे आणि स्टाइलचे बरेच चाहते आहेत. पण त्यांचा साधेपणा आणि सहज वावर चाहत्यांना खूप भावतो. रजनीकांत यांच्याबद्दल लोकांमध्ये इतकी क्रेझ आहे की, ते दक्षिणेत अनेकजण त्यांना ‘देव’ मानतात. शिवाजी राव गायकवाड असं त्यांचं मूळ नाव आहे. रजनीकांत पाच वर्षांचे असताना त्यांची आई जिजाबाई यांचं निधन झाल होतं. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी सुरुवातीला कुली म्हणूनही काम केलं. त्यानंतर ते बसमध्ये कंडक्टर म्हणून काम करू लागले होते.

रजनीकांत यांनी 1975 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अपूर्व रागांगल’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात त्यांच्यासोबत कमल हसन आणि श्रीविद्या यांसारख्या बड्या स्टार्सनीही काम केलं होतं. रजनीकांत यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात अनेक नकारात्मक भूमिका केल्या आहेत.